कायदे

प्रतारणा की स्वातंत्र्य?

नुकताच "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू" पाहिला. मूळ कादंबरीही या पूर्वी वाचली होती. चित्रपटाच्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनला आहे याबाबत कोणालाही शंका नाही पण चित्रपटाचा शेवट हा कादंबरीच्या शेवटापेक्षा वेगळा आहे.

अजमल कसाबचं काय केलं?

अजमल कसाबचं काय केलं?

दारिद्र्य

नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे.

इंटरनेट प्रायव्हसी

इंटरनेटवर लाखो संकेस्थळे आहेत. त्यातील काही संकेतस्थळावर आपण सदस्य होतो. उदा. फेसबुकासारख्या संकेतस्थळावर तर लोक बिंदास आपली खासगी माहिती देताना दिसतात. फोटो टाकतात.

निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार

जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.

'दुसर्‍या स्वातंत्र्या'कडे भारताची आगेकूच!

लेखकः सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
(हा लेख 'ई-सकाळ'च्या वेब एडिशनवर १७ ऑ. २०११ रोजी प्रकाशित केला गेला.)
आपल्या "खाबूवीरां"नी भारतीय जनतेला लुटून स्विस आणि इतर बँकांत ठेवलेल्या पैशांचा हिशेब करणे सोपे नाहीं कारण त्यात इतकी शून्ये असतात कीं दोन्ही हाताचीच काय पण सोबत दोन्ही पायाची बोटे सुद्धा पुरणार नाहींत!

अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नवीन विधेयक मांडण्याच्या विचारात आहे त्याबद्दल एक लेख आजच्या लोकप्रभेत वाचला.

लोकपाल विधेयक : दोन मसुद्यांमधले अंतर

सिव्हील सोसायटी (=सभ्य समाज) आणि राज्यकर्ते (=असभ्य समाज?) यांच्यातल्या वाटाघाटींचे सूप वाजले.

अरुंधती रॉय (आणि तत्सम)

व्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.

लोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आवाहनाला न जुमानता कालपासून लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणावर बसले आहेत.

एच पी च्या थर्डक्लास सेवेपासुन जीव कसा वाचवावा?

सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं.

लाचखोरी प्रतिबंध

भारतातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी http://www.ipaidabribe.com/ अशी साइट् सुरू केल्याची माहिती मिळाली. साइटचा उद्देश विविध ठिकाणांहून लाच दिल्याचे/ देण्यास भाग पाडल्याचे प्रसंग लोकांनी नोंदवावेत असा आहे.

बौद्धिक संपदा कायद्यांतील अतार्किकता

उपक्रमवर एकस्व कायद्याविषयी लेखमाला सुरू झाली होती. या विषयाची मला थोडी माहिती असल्यामुळे अनेक शंकासुद्धा होत्या आणि त्या लेखमालेत माझ्या शंका विचारण्याची माझी इच्छा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत त्या लेखमालेचे पुढील भाग प्रसिद्ध न झाल्यामुळे (तसेच त्या लेखमालेच्या व्याप्तीत माझ्या शंका बसतील की नाही त्याची खात्री नसल्यामुळे) माझ्या शंकांसाठी हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे. माझ्या माहितीवर आधारित माझी मते मी देतो आहे. या विषयांवर अधिक माहिती द्यावी, तसेच मतप्रदर्शन करावे, अशी माझी सर्वांना विनंती आहे.

जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांच्यावरील आरोप आणि युरोपवारी

नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांना आपल्या युरोपवारीचे बेत रद्द करावे लागलेले आहेत.

इस्लामिक (?) बॅंक कशासाठी ?

केरळ उच्च न्यायालयाने नुकतिच इस्लामिक बॅंक स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. इस्लामिक शरियत कायद्यानुसार या बॅंकेचा कारभार चालणार आहे व तिच्यावर इतर बॅंकांप्रमाणे रिजर्व बॅंकेचे नियंत्रण नसेल.

सायबर क्राइम

एखादी घटना आजुबाजुला घडली की तिचे गांभीर्य जास्त जाणवते. आज पर्यंत ऐकत आलेलो सायबर क्राइम प्रकरण जेव्हा माझ्या मित्राच्या बाबतीत घडले तेव्हा आम्ही च्याट पडलो.

भारतीय एकस्व कायद्याची ओळख: भाग १

सध्या आपल्या आसपास एकस्व (पेटंट) ह्या विषयाबाबत अनेक चुकीच्या समजुती प्रचलित झाल्याचे दिसते.

कानपुर आय आय टी मधील मध्यरात्रीनंतरची ईंटरनेट बंदी

आय आय टी मधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांवरील मानसीक दबावामुळे व ते पुरे करु शकत नसलेल्या अभ्यासामुळे. असे का होते तर ते वर्गात झोपा काढतात. का, तर ते रात्री झोपत नाहीत म्हणुन. का झोपत नाहीत तर ईंटरनेट सुरु असते.

खबरदार, दहशतवाद्यांवर नी फुटीरतावाद्यांवर कारवाई कराल तर!

दिनांक ५ नोव्हेंबरच्या 'टाइम्स् ऑफ् इंडिया'मधे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांना आपला इंग्लंडचा प्रस्तावित दौरा रद्द करणे भाग पडले अशा अर्थाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. कारण?

मोठा भाऊ

"मोजक्याच पर्यायांपैकी एक निवडा" हे भासमान स्वातंत्र्य वापरकर्त्यांना देतात अशी टीका ऍपल किंवा मायक्रोसॉफ्ट या उत्पादकांवर अनेकदा केली जाते. परंतु विनोदी/संशयी लेखन वगळले तर त्यांच्यावर दुष्टपणाचा आरोप होत नाही.

शेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न

शेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत.

रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल

सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.

ठोकशाही

कसाबचे वकीलपत्र घेणार्‍या वकिलांवर दबाव आला होता. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र मागे घेतले.

रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.

'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

घटनेतील कर्तव्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच. धर्मवाद्यांनाच ती मान्य नाहीत.

समलिंगी विवाह

स्टार ट्रेक या मालिकेचे एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या अनेक भागांमध्ये तत्कालीन सामाजिक 'समस्यांवर' संदेश असतो.

अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या,

अंधार कोठड्या , जेलरचा धाक, खराब बेचव अन्न, कामात चूक झाली तर मार ,गुंड मवाली खुनी दरोडेखोर यांची दिवसरात्र भीतीदायक साथ-संगत शरीराचे कातडे सोलून काढणारी पोलिसांची अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी आठवूनच सामान्य माणूस गुन्हाच का

शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो

माहितीचा अधिकार खालील लिंक्स वर आणि CIC http://www.cic.gov.in/ या भारत सरकारच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या साईट वर सर्व माहिती मिळेल .

अवमान, मानहानी, चिथावणी

जालावरील चर्चा वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की 'नेहमीचे यशस्वी' लेखक वगळता अनेकांकडे ज्ञान, जिज्ञासा किंवा चर्चेची चिकाटी अगदीच कमी असतात.

मराठी या ज्ञानभाषेतून गणित-विज्ञान हे दोन विषय चांगले समजतात

मातृभाषेत.. विज्ञानशिक्षण के.जी.टू.पी.जी. लोकसत्ता सोमवार, १२ जुलै २०१०
प्रा. अनिल गोरे - सोमवार, १२ जुलै २०१०

तर्कक्रीडा - पहेचान कोन?

एक फार रोचक गोष्ट अनुभवास आली. सनस्क्रीन लोशन ऐकले असेल. सुर्याकिरण-युव्ही इ बचाव करण्यास व त्वचारक्षणास उपयुक्त म्हणून याचा वापर आहे.

खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका

माझे ब्लॉगर मित्र आणि सामाजिक डॉक्टर यांनी खासदारांच्या वेतन वाढी विरोधात"सजग'चे विवेक वेलणकर यांनी सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.

या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.

ब्लॉगिंग जगतातून साभार पोहोंच .
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.
प्लास्टिक पिशव्यांना बंदी .
सार्वजनिक ठिकाणी दारू , सिगारेट पिण्यास बंदी.
या घातपाता मागे परकीयांचा हात आहे.

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत

सरकार,नोकरशाही,शिक्षणतंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एकवर्षीययोजना तय्यार केली

अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षा पासून सरकार,नोकरशाही , शिक्षण तंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार आहे.कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा श

त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण

जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रि

भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

जनगणनेत जात?

भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे.

जनगणना अनुभव

आजच आमच्याकडे जनगणनेसाठी एक बाई आल्या होत्या. अन्य माहिती सोबतच त्यांनी माझी जात सुद्धा विचारली. खरतर सरकारने जातीनिहाय जनगणनेसाठी अजूनही आदेश काढलेला नाही.

बलात्कार कायदा

कालपरवा एक बातमी पाहिली. एक एअर होस्टेस आणि एक पायलट २००७ पासून एकत्र रहात होते. २०१० मध्ये त्याने लग्न करण्यास नकार दिला त्यानंतर त्या स्त्रीने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.

मंगलोरचा विमान अपघात

नुकत्याच मंगलोरला झालेल्या विमान अपघाताबद्दल एक वेगळी माहिती मला मिळाली.

शिक्षणाचा मूलभूत हक्क की कारस्थान

एखादी चांगली गोष्ट घडत असली की काहीतरी कुजक्या शंका काढून त्यात खोडा घालायची सवय काही महाभागांना असते.

भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.

आजच एका समाजसेवी संस्थे कडून एक मेल आला. महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार नवीन नाही. आपण सर्व महिलाच सन्मानासाठी, त्यांचा न्यायासाठी काम करत आहोत. कुटुंब अर्थ सहाय्य योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे.

Syndicate content