वैश्विक जाळे

पुस्तक प्रकाशन विश्वाचा आढावा घेणारे संकेतस्थळ.

आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे.

बिग बॅग प्रयोगावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी

लार्ज हॅड्रॉन कोलायडर (Large Hadron Collider, LHC), बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बर्‍यावाइट कारणांनी वेधून घेतले आहे.

गूगल क्रोम

गूगलने क्रोम हा नवा न्याहाळक बाजारात आणला आहे.

या न्याहाळकाविषयी इथे चर्चा करूयात.

दुसरे जाळे - वेब २.०: अशील-सेवक कार्यप्रणाली (क्लायन्ट्-सर्वर् सिस्टम्)

या लेखमालेच्या मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे दोन संगणक परस्परांशी 'इलेक्ट्रॉनिकली' संवाद साधायला लागल्यानंतर, अशी अनेक स्थानिक संवादजाळी एकमेकांना जोडली गेल्यानंतर सद्य स्थितीतले आंतरजाल अस्तित्त्वात आले.

उबुंटु ८.०४: हार्डी हेरॉन

साधारण ८ महिने मी उबुंटू ७.१ वापरले. त्याला प्रचलित नाव म्हणजे गट्सी गिबन. अतिशय आनंददायी अनुभव. माझा ल्यापटॉप ड्युएल बूट आहे.

हेराफेरी - डीएनएस कॅश पॉइजनिंग

इंटरनेटचे सध्याच्या काळातले महत्त्व काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. इंटरनेट आता खर्‍या अर्थाने सर्वव्यापक झाले आहे. मनोरंजन, अभ्यास, संशोधन यापासून बँकिंग, तिकीट आरक्षण, बिल भरणे इ.

लोकायत नावाचे मराठी संकेतस्थळ...

http://www.lokayat.com/

आजच्या दिवशी लोकायत नावाचे आणखी एक मराठी संकेतस्थळ जन्माला आले आहे याचा मला विशेष आनंद वाटत आहे. मनोगत, उपक्रम आणि मिसळपावाच्या भावंडात आणखी एकाची भर झाली आहे.

इतिहासजमा साहित्यधन आता इंटरनेटवर

इतिहासजमा झालेलं मराठीतलं अभिजात वाङ्मय, साहित्य, ज्ञानभंडार हे सर्वसामान्यांना वाचता यावं, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा यासाठी 'ई-संवाद' हा उपक्रम ठाण्यातल्या 'संवाद' या संस्थेतर्फे हाती घेण्यात आला असून लेखाधिकार कायद्या

गूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद

गूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा.

डिजिटल लायब्ररी

डिजिटल वाचनालये

हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.

फायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा!

फायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे.

धडपडतंय का?

काही गडबड
उपक्रमावर वावरतांना गेल्या काही दिवसांपासून मला अडखळायला होतं आहे.
खरडवहीवर टिचकी मारावी तर कसली तरी एरर येते.

दगड

दगड

दगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.
याची तोड जगात कुठेही नाही.

मराठी विकि वर 'माहिती' च नाही?

मराठी विकि वर 'माहिती' च नाही?

उपक्रम या स्थळाची सुरुवात माहितीपूर्ण लेखन या उद्देशा साठी झाली आहे. या मुळे येथे हा विषय चर्चेला घेत आहे.

मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ

  • मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
  • लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
  • ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
  • मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे

विश्वजालावरील देवाण-घेवाण : श्रेयस आणि प्रेयस

अलिकडच्या काही दिवसांमधे मराठी संस्थळांवर वाचन करताना या संस्थळांवरील विचारांच्या देवाणघेवाणीबद्दलच चर्चा करणारे १-२ लेख वाचले.

आणि आता गूगल नॉल

वाचतावाचता गूगल आता विकीपेडियाच्या धर्तीवर आपला नॉल काढणार असल्याचे समजले.
(कदाचित येथील अनेक मंडळींना ही बातमी जुनी असावी.)
गूगलला कोणत्याही गोष्टीचा आपल्या फायद्यासाठी वापर करायला छान जमते.

"उपक्रम" ची म. टा. ने घेतलेली दखल...

आजच महाराष्ट्र् टाईम्स मध्ये खालील लेख वाचला. आपल्या माहिती साठी इथे डकवत आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2538505.cms

उपक्रम...मराठीतून व्यक्त होण्याचा!
13 Nov 2007, 1902 hrs IST

- नील वेबर

तुम्ही इंटरनेटवर सुरक्षित कसे राहता?

काल, म्हणजे १२ फेब्रुवारी २००८ रोजी "सेफर इंटरनेट डे" साजरा झाला. इंटरनेटचे उपयोग आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही घराघरात आणि गल्लोगल्ली इंटरनेटचा प्रवेश झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट याहू विकत घेणार?

आत्ताच बातमी वाचली की मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरची ऑफर दिली आहे. हे प्रत्यक्षात उतरल्यास आंतरजालामध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

खंडीत आंतर्जाल प्रवाह (इंट्रनेट ट्रॅफिक)

आत्ताच एनपीआरवर ऐकले आणि नंतर येथे पाहीले की इजिप्तचय भागात भूमध्यसमुद्रात दोन केबल्स खंडीत झाल्याने मध्यपूर्वेत जास्त आणि भारतात ५०% इंट्रनेट स्थगीत/खंडीत झाले होते.

जीमेल हॅकींग : एक नवा प्रकार

आज माझ्या जीमेल खात्यावर माझ्या एका परिचितांकडून विरोप आला. हे डेक्कन कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. विरोप धक्कादायक होता. "मी नायजेरियामध्ये एड्स परिषदेसाठी गेलो असताना माझा पासपोर्ट, पैसे सर्व हरवले आहेत.

डृपलसंबंधी मदत हवी आहे

मी एक संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ बनवू इच्छीत आहे.त्यासाठी डोमेन व वेबस्पेस ही घेतली आहे.मी हे संकेतस्थळ डृपल या प्रणालीचा वापर करुन बनवत आहे पण मला पीएचपीचे अथवा डृपलचे फारसे ज्ञान नाही यामुळे काहि अडचणी य

शोधयंत्राचा शोध - भाग ११ : एका महासत्तेचा उदय

शोधयंत्राचा शोध घेता घेता आपण पोहोचलो आहोत १९९७ मध्ये. स्थळ, अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरच्या उत्तर कॅलिफोर्नियातील उपसागरीय भागातले (बे एरिया, सिलिकॉन व्हॅली) एक विद्यापीठ, स्टॅनफोर्ड.

शोधयंत्राचा शोध - भाग १० : प्रभावळी

आपण एखादी नवीन कंपनी काढावी हे कुणाला का वाटते? ह्याचे उत्तर आपल्याला आजवर स्थापन झालेल्या संस्थांतून सापडते. आपण काही उदाहरणांतून ह्याचा आढावा घेऊ.

आयपी पत्ते हुडकणे : थोडे शास्त्र, थोडी कला

सुमारे एक वर्ष झालं ह्या गोष्टीला. तेव्हा माझा एका ख्यातनाम वगैरे मराठी संकेतस्थळावर वावर होता. हे संकेतस्थळ ड्रुपॅल वापरूनच बनवले होते. बऱ्याच संकेतस्थळांसारखे तेथेही सदस्य टोपणनावांनी प्रवेश करत.

कल्पनागार ३: मुखपृष्ठे

नमस्कार. कल्पनागार २ चढवल्यानंतर ह्या तिसर्‍या भागाला बराच विलंब झाला आहे. कल्पनागारा मागची मूळ प्रेरणा ही विदाखननाची (डेटा मायनिंग) आहे.

ड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली

काही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता.

दुसरे जाळे - वेब २.०: आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास

आंतरजाल किंवा इंटरनेट हा एका रात्रीत जन्माला आलेला आविष्कार नाही. पण त्याच वेळी इंटरनेटच्या जन्माची गोष्ट म्हणजे एखादी मनोरंजक परीकथाही नाही.

दुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना

लेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्‍या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का?

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

शुद्धलेखन चिकित्सा

शुद्धलेखन व स्वयंसुधारणा

शुद्धलेखन सहाय्य सहजतेने उपलब्ध असेल तर नक्कीच वापरले जाते असे मला वाटते.

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?

मराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत?
मराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.
त्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.

ऑर्कुट आता मराठीत

नमस्कार,
आज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.

एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २

तीन स्तरीय व्यवस्था

इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.

वाइन : एक परंपरा

वाईनवरील एका लेखमालेच्या आधारे सदर लेख या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दल कोणाला आणखी काही ठोस माहिती असेल तर त्यांनीही ती द्यावी ही विनंती.

संकेतस्थळ विकास प्रस्ताव

मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.

भारतातील लमाणतंत्रज्ञानाविषयी माहिती हवी

लमाण ही एक जमात आहे. ते लोक आपले उंट आणि शेळ्या घेऊन देशभर भटकतात. शेळ्या दररोज कुणाच्यातरी शेतात "बसवतात". त्यासाठी शेतकरी त्यांना पैसे देतात, कारण नैसर्गिक खताची सोय त्यातून होते.

मराठी व मराठी समाजाच्या विकासासाठी आपण काय करु शकतो?

मुंबई, पुण्या सारख्या शहरांमधुन विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले परप्रांतियांचे अतिक्रमण हा सध्या अनेकांच्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे.

मुलांसाठी मराठी संकेतस्थळ -२

कालची चर्चा -
देवनागरी मुलांच्या लक्षात राहावी, सतत वाचन आणि लिखाण देवनागरीत व्हावे, ह्यासाठी काय करावे, ह्याचा विचार "ऑफ अँड ऑन" करत असतानाच काल गुंडोपंतांनी म्हटले: "मुलांसाठी मराठी संकेतस्थळ काढले तर कसे ?"

मुलांसाठी मराठी संकेतस्थळ ?

ह्या चर्चाप्रस्तावाची पार्श्वभूमी सांगतो.

ड्रुपॅल, जीपीएल, आणि त्यावर आधारित संकेतस्थळे

मनोगत, उपक्रम्, माझे शब्द, मराठी गझल.कॉम, सुरेशभट.इन ह्या सर्व संकेतस्थळांत काय साम्य आहे ?
ही सर्व संकेतस्थळे ड्रुपॅल ही साहित्यव्यवस्थापन प्रणाली (काँटेंट मॅर्‍नेजमेंट सिस्टम) वापरतात.
ड्रुपॅल ही एक मुक्तस्रोत आज्ञावली आहे.

ब्लॉग वरील अक्षरे

ब्लॉग वरील अक्षरे उपक्रम अथवा मनोगत इत्यादी स्थळांप्रमाणे सुबक दिसण्यासाठी काय करावे? मागे एकदा शनिपार का कोणतासा टंक मनोगतावर वापरतात असे ऐकले होते. हा अथवा जो कोणता फाँट मनोगत/उपक्रम वापरतात तो ब्लॉगवर कसा आणायचा?

नवी सुविधा - गूगल शोध

उपक्रमवर आता ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेच्या बरोबरीने गूगल शोधाची सुविधा उपलब्ध आहे!

नव्या सुविधेचे फायदे

Syndicate content