संस्कृत

जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषांमध्ये संस्कृत भाषेची गणना होते. महाकाव्ये, नाटके, सुभाषिते हे वेगवेगळे साहित्यप्रकार आणि आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत लेखन झाले आहे. भारतीय भाषांवर संस्कृतचा प्रभाव वादातीत आहे. संस्कृत भाषाप्रेमींसाठी आणि संस्कृत भाषेची अधिक माहिती घेऊ इच्छिणार्‍यांसाठी हा समुदाय आहे.

तुम्ही कसा सहभाग घेऊ शकता?

  • संस्कृतभाषेशी संबंधित विषयांवर लेख लिहून
  • चर्चेत भाग सहभागी घेऊन
  • शंका/अडचणी विचारून
  • आपल्याला माहिती असल्यास इतरांच्या शंकांचे समाधान करून

संस्कृत भाषाप्रेमींचे आणि संस्कृत भाषेची अधिक माहिती घेऊ इच्छिणार्‍यांचे स्वागत आहे!

वृत्तदर्शन

अङ्कानां वामतो गति:

या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग ३/३)

शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "आकृती" किंवा फक्त "जाती" असतो का? साधक-बाधक चर्चा
- - -

(मागच्या भागात पूर्वपक्ष होता - "शब्दाचा अर्थ म्हणजे व्यक्ती" तो खोडून काढला, येथे वेगळा पूर्वपक्ष देणार आहोत.)

या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग २/३)

शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त "व्यक्ती" असतो का? साधक-बाधक चर्चा
- - - -

चर्चा सुरू होण्यापूर्वी वात्स्यायन अशी भूमिका तयार करतो (सूत्र क्र. २.२.५५च्या भाष्याच्या शेवटी) :

या शब्दाचा अर्थ तरी काय? (भाग १/३)

(येथे न्याय-दर्शनातील "पदाचा अर्थ" चर्चा आपण बघणार आहोत.)

प्रास्ताविक :

संस्कृत शब्दांचे अचूक उच्चार कसे करायचे?

नमस्कार!
स्तोत्र वगैरे वाचताना अचूक उच्चार कसे करायचे त्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे.

वेद् आपौरुषेय आहेत का ?

वेदांबद्दल 'संस्कृत' समुदायात बरीच रोचक आणि ज्ञान वाढवणारी चर्चा चाललेली आहे.

वैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९)

ऋग्वेदात जगाच्या उत्पत्तीबद्दल विप्रश्न करणारी काही सूक्ते आहेत. त्यात दोन "भारत एक खोज" या दूरदर्शन मालिकेच्या सुरुवातीला ऐकून आपल्या परिचयाची झालेली आहेत.

वैदिक ऋचांचे रसग्रहण (अथर्ववेद दन्तसूक्त ६:१४०)

ऋग्वेदाचे जे प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे, ते अन्य वेदांना नाही. (अर्थात यजुर्वेदी, सामवेदी घराण्यातल्या लोकांची येथे माफी मागतो.) पण त्यांतही बिचार्‍या अथर्ववेदाला तर पूर्वी "वेद" असे म्हणतसुद्धा नसत.

वैदिक ऋचांचे रसग्रहण (मण्डूकसूक्त ७:१०३)

उपक्रमावर "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले" या मालिकेत सध्या ऋग्वेदाबद्दल चर्चा चालू आहे. त्यात ऋग्वेदाबद्दल भारावून टाकणारे साहित्य अशा प्रकारचा उल्लेख आला आहे.

गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण

तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :

मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

धातुपारायण

संस्कृतमधील विविध धातु आणि त्यांची रुपे ह्यांचे सार्वजनिक पारायण मुंबईतील एक अभ्यासकांचा गट नियमित करतो. सर्व संस्कृत प्रेमींना ह्यात सहभागी होता येईल.

हातभार

गेल्या महिन्यात काही कारणाने दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात जाणे झाले. नेहेमी प्रमाणेच त्यांनी दर्जेदार कार्यक्रम आयोजित केला होता.

संस्कृतभारतीद्वारा सरलसंस्कृत सम्भाषणवर्ग

सोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.

वेळ - सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत.

भाषाशुद्धीचे यशापयश आणि सावरकर

'सिग्नल'साठी 'अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका' किंवा तसलाच काहीतरी संस्कृतोद्भव शब्द रुळवण्याच्या
[भाषाशुद्धीवादी/सावरकरी?] प्रयत्नाचे काय हसे झाले, विसरलात एवढ्यात?)

उच्चारण कार्यशाळा

आमच्या संस्थेतर्फे मुंबईत लवकरच एक उच्चारणशास्त्र कार्यशाळा होणार आहे. संस्कृतप्रेमींना हार्दिक निमंत्रण. त्या काळात जर मुंबईला येणे झाले तर मी ह्या कार्यशाळेला नक्की येईन. तेव्हा आपली भेट होईलच.

कलोअ,
आपला विनम्र,
ऋजु.

देवनागरी लिपी व भाषाशुद्धी

१) संस्कृत भाषा व देवनागरी लिपी ही जगातील सर्वात जास्त शास्त्रशुद्ध भाषा व लिपी आहे, असे आपण म्हणतो. यात अभिमानाचा भागही काही असतो, पण आपल्याला त्याबद्दल शास्त्रीय माहिती कमीच असते.

संस्कृत- जिवंत की मृत? - काय फरक पडतो?

एका प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रुपांतर करते आहे.

संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?

राम राम मंडळी,

कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील..

१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.

संस्कृतदिन

आपल्या भारतात श्रावण शु.पौर्णिमेला ''संस्कृतदिन'' साजरा केला जातो.ह्या दिवशी भारत सरकारतर्फे व महाराष्ट्र सरकारतर्फेही कांही वयोवृध्द संस्कृत विद्वानांचा यथोचित सत्कार करण्यात येतो.संस्कृतविषयानुरुप अनेक कार्यक्रम आयोजित

प्राण्याविषयीची सुभाषिते...

आमच्याच शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक मिश्राजी यांच्याशी एकदा मी डुक्कर ह्या प्राण्याविषयी बोलत होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की सुव्वर हा शब्द मूळ संस्कृत शब्द सूकर ह्यावरून आला आहे.

डोम्बिवली-नगरमध्ये संस्कृत-अनुरागिणां संस्कृतेन सम्मेलनम्

सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
*
*
*

गहन आणि गुढ

नुकतीच ऋग्वेदातील एक सुंदर ऋचा वाचण्यात आली.

अरुणो मा सकृत् वृक: पथायन्तं ददर्शहि
उज्जिहीते निचाय्या तष्टेव पृष्ठयामयी ।। १-१०५-१८

इन्द्राय इन्दो परिस्रव ।।

भारतात बरीच मद्यप्रिय लोकं जर ऋषीमुनी सोमरस पित होते तर आम्ही मद्यपान करणे गैर कसे अशी मखलाशी करतात.

संस्कृतचे मारेकरी

एकदा आम्ही आपल्या संस्कृत वर्गात निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याची आपसांत चर्चा करत होतो.

एक विशेष विभक्ती उपयोग

आम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ
आली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.

माझे आवडते सुभाषित

सुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता
परो ददाति इति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून निबंध सुलभलेखन.

(एक विनम्र सूचना - प्रस्तुत लेख संस्कृत विद्वज्जनांसाठी नाही).

दरवर्षी आयईएस संस्कृत केंद्र संस्कृत शिक्षकांसाठी वर्ग घेते ज्यात संस्कृत विषयात

एक संस्कृत एकांकिका

नमस्कार मंडळी,
मुंबईत ठाणे येथे नवरात्रीनिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात उद्या म्हणजे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी, शनिवारी रुईया महाविद्यालयातर्फे एक संस्कृत एकांकिका सादर केली जाणार आहे.

गीत मेघदूत ..२

II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II

गीत मेधदूत ..१

राम राम मंडळी,

तसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।

जैन साहित्यातील विश्वाकार - भाग ३ (अंतिम)

पहिल्या दोन भागांतच जवळपास सगळे सांगितले आहे. आणखी खूप सांगण्यासारखे नाही. प्रश्न "विश्व" ह्या गोष्टीचा नसून भाषेचा आहे, हीच ह्यातली गोम.

जैन साहित्यातील विश्वाकार - भाग २

आता जैन दर्शनाऐवजी "झेन" दर्शनाचा विचार करणार आहोत. दोघांचा संबंध काय? खूप दाट संबंध नसेल. पण दोन्हींचा जन्म एकाच संस्कृतीतला आहे.

जैन साहित्यातील विश्वाकार - भाग १

जैन वाङ्मयात जी विश्वाची संरचना सांगितली आहे ती थक्क करणारी आहे. ते समुद्र, ती द्वीपे, आकाश, पाताळ, ह्यांबद्दल वाचताना माणूस अक्षरशः हरवून जातो. पण ह्या सर्वांवर कळस म्हणजे विश्वाच्या एकूण आकाराबद्दलची कल्पना.

वर्णमाला- शेवट

आधीच्या लेखात आवाहन केल्याप्रमाणे वर्णमालेबाहेरचे वर्ण शोधण्याचे कुतुहल एकाही वाचकाला वाटल्याचे दिसले नाही. असो, चालायचेच!

आषाढस्य प्रथम दिवसे..

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

राम राम मडळी,

वर्णमाला (स्वर)

काही तांत्रिक कारणांमुळे हा भाग उपक्रमावर आणायला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!

बौद्ध साहित्यातील नावे!

मिलिंद, राहुल अशी दोनतीन नावे भारतात बुद्धधर्माचा सर्वत्र प्रसार होता तेव्हापासून प्रचारात आलेली आहेत, हे आपल्याला माहित असते.

ग्रंथ- उपलब्ध / अनुपलब्ध

नमस्कार मंडळी,

वर्णमाला- व्यंजने

गेल्या भागात आपण क् ते स् हे वर्ण पाहिले. त्यांच्यापुढील वर्णांचे उच्चारक याप्रमाणे-
य्- तालव्य
र्, ळ्- मूर्धन्य
ल्- दन्त्य
व्- दन्तोष्ठ्य
ह्- glottis.

दुहेरी अर्थाचे सुभाषित

कॉलेजात असताना राहुल सांकृत्यायन यांच्या संस्कृत वेच्यांच्या संग्रहात बिज्जका (म्हणजे विजया) ह्या कवयित्रीची एक कविता मी वाचली होती. नीट आठवत नाही, आणि विभक्तीप्रत्यय आणि "चालवणं" वगैरे रामो राजमणिः च्या पलिकडे येत नाही.

वर्णमाला- उच्चारक्रिया

या भागात काही तांत्रिक संज्ञा इंग्रजी भाषेत लिहिल्या आहेत, या संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचे काम सुरू आहे.

वर्णमाला- (समज- गैरसमज)

काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की 'इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो?' तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती.

दशरूपक

स्वप्नवासवदत्तम वरील लेखांत नाट्याचे १० प्रकार असतात असा उल्लेख मी केला होता व काही वाचकांनी ते १० प्रकार कोणते असे विचारले होते. त्यांचे कुतुहल आणखी थोडे चाळवण्यासाठी त्या १० प्रकारांची जुजबी माहिती येथे देते आहे.

स्वप्नवासवदत्तम्- मला आवडलेले

मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.

स्वप्नवासवदत्तम्- कथानक

भासाने उदयनकथेवर २ नाटके लिहिली. त्यापैकी पहिले 'प्रतिज्ञायौगंधरायण' आणि दुसरे 'स्वप्नवासवदत्तम'. 'प्रतिज्ञायौगंधरायण' जिथे संपते त्याच्या काही काळानंतर 'स्वप्नवासवदत्तम'चे कथानक उलगडते.

Syndicate content