लेखमालिका
उपक्रमाच्या सदस्यांनी वेळोवेळी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या लेखमालिकांचा वाचकांना अधिक चांगल्या रीतीने आस्वाद घेता यावा यासाठी अश्या लेखांना एकत्रित केले आहे.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद
प्रकाश घाटपांडे
भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठेसाठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
पुढे वाचा
वर्णमाला
राधिका
संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.
पुढे वाचा
व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण
धनंजय
संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासकांना सर्वात शिरोधार्य ग्रंथ म्हणजे पतंजलींचे व्याकरणमहाभाष्य. महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.
पुढे वाचा
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

ब्रह्मलक्षण
शरद
सत् ,चित् व आनंद ही आत्म्याची (किंवा ब्रह्माची) लक्षणे मानली आहेत. सत् म्हणजे " असणेपण किंवा सत्ता. चित् म्हणजेचैतन्य किंवा जाणीव..आत्म्याच्या बाबतीत द्वंदाला वाव नसल्याने सुख-दु:खातील सुख म्हणजे आनंद नव्हे .एखाद्या इंद्रियाच्या तर्पणाने मिळ्णारे सुख किंवा दु;खाच्या अभावाने भासणारे सुख हे तत्कालीन किंवा क्षणभंगूर;. त्याचा आत्म्याशी संबन्ध येऊच शकत नाही. आनंद ही आत्म्याची स्वाभाविक, अपरिवर्तनीय स्थिती आहे.
ब्रह्म सर्वत्र आहे. त्याच्या असण्याला कालाचे किंवा स्थलाचे बन्धन नाही. हे असणे त्रिकालातीत आहेच आणि भासमान विश्व असले नसले तरी असणारच आहे. त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही, ते कशानेच बाधीत होत नाही. पण त्याच्यामुळॆचअखिल जगताचे अस्तित्व टिकून आहे. ब्रह्माची ही सत्ता म्हणजेच ’सत्’. क्रियाहीन ब्रह्माला सत्ता आहे, मायेला नाही ती
यामुळेच. भाव म्हणजे चिरस्थायित्व. सताला भाव आहे किंवा अभाव नाही म्हणणे म्हणजे राजाला राणीव आहे म्हणणॆ. जर सताला भाव असेल [पक्षी: अभाव नसेल ] तर असताला भाव नसणारच
स्वामी प्रभुपाद य़ांनी असत् म्हणजे भौतिक शरीर व सत् म्हणजे जीवात्मा असा अर्थ लावून शरीर दीर्घ काल टिकतनाही व जीवात्मा कधीच बदलत नाही असा निष्कर्ष काढला.
सत् जरी शाश्वत असले तरी नासदीय सूक्तात, विश्वाच्या सुरवातीला असत् तर नव्हेच पण सत् तरी अस्तित्वात होते का,या बद्दलच शंका घेतली आहे.
सताचे दूसरेही अर्थ उपनिषदांमध्ये आढळ्तात. भाव-अभाव या अर्थांने छांदोग्य ऊपनिषदांत [६.२.२] उद्दालक आरूणि म्हणतात"काही म्हणतात, जगदोत्पत्तीपूर्वी असत् होते व त्यापांसून सत् निर्माण झाले, पण मला हे पटत नाहीं कारण अभावा[असत्]पासून सत् [भाव] कसा निर्माण होऊ शकेल? "
तैत्तरीय उपनिषदांत सत् -असत् चे अर्थ व्यक्त-अव्यक्त असे धरून [२.७] पूर्वी
असत्[अव्यक्त] होते व त्यापासून सत्[व्यक्त] निर्माण झाले असे सांगितले आहे.
सत्-असत् बाबत निरनिराळ्या ॠषींमध्ये एकमत दिसत नाही.
समित्पाणी शरद