आमचा त्यांचा इतिहास
इतिहास हा बर्याचजणांच्या नावडीचा विषय, सहसा कामाचा किंवा फायद्याचा नसणारा परंतु भूतकाळात डोकावायला प्रत्येकालाच आवडते. तेव्हा इतिहासाचे अवघड ओझे सांभाळून आपली आणि इतरांची पाळेमुळे खणून काढण्याची आवड असणार्यांचा हा समुदाय
- काळाच्या ओघात विसर पडलेल्या अनेक गोष्टी/ प्रसंग
- आपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांतील साम्यस्थळे
- तथ्याधारित तसेच पौराणिक ग्रंथांमधील प्रसंग
- अनेक जुन्या गोष्टींची उगमस्थाने
- जुन्या पुराण्या गमती-जमती
गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?
प्रेषक सागर (शुक्र, 03/23/2012 - 13:43)नमस्कार वाचकांनो,
आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
वैदिक संस्कृतीतील व्यापार
प्रेषक योगप्रभू (गुरू, 03/22/2012 - 20:20)भारताला धार्मिक आणि सामाजिक इतिहासाइतकाच प्राचीन व समांतर असा व्यापारी इतिहासही आहे. त्याच्या पाऊलखुणा अगदी वैदिक संस्कृतीपासून आढळतात.
पोथ्यांचा अमूल्य खजिना
प्रेषक निनाद (गुरू, 02/16/2012 - 00:34)पोथ्यांचा अमूल्य खजिना एचपीटी कॉलेजमधील भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयात असा जतन केले आहे हे वाचून अतिशय आनंद झाला. आंतरजालावर शोध घेतांना मला हा दुवा आढळला. ही माहिती इतरांनाही व्हावी म्हणून दुवा आणि लेख येथे देत आहे.
इतिहासाचे संरक्षण
प्रेषक प्रियाली (शुक्र, 12/02/2011 - 18:58)एक वाक्य नुकतेच वाचनात आले. - जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो.
दिवाळी अंक २०११: "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई"
प्रेषक रोचना (रवि, 10/30/2011 - 17:59)प्रियालींचा "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली! किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले.
रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना
प्रेषक रोचना (गुरू, 10/20/2011 - 09:51)दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.
भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती
प्रेषक मन (गुरू, 09/15/2011 - 06:25)१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?
पार्श्वभूमी:-
सोळा संस्कार
प्रेषक निनाद (शुक्र, 07/29/2011 - 05:30)हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) पुढील प्रमाणे आढळतात.
1. गर्भाधान
2. पुंसवन
3. अनवलोभन
4. सीमंतोन्नयन
5. जातकर्म
6. नामकरण
7. सूर्यावलोकन
8. निष्क्रमण
9. अन्नप्राशन
10. वर्धापन
11. चूडाकर्म
12. अक्षरारंभ
13. उपनयन
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)
प्रेषक मन (रवि, 04/03/2011 - 20:37)नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः-
भाग ३ http://mr.upakram.org/node/3206
भाग २ http://mr.upakram.org/node/3203
भाग् १ http://mr.upakram.org/node/3196 .
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ३)
प्रेषक मन (मंगळ, 03/22/2011 - 09:11)नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः- भाग २ http://mr.upakram.org/node/3203
भाग् १ http://mr.upakram.org/node/3196
हा भाग तिसरा. तिसऱ्यावरून आठवलं इब्राहिमी धर्मही महत्त्वाचे तीन आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे प्रेषित ती
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २)
प्रेषक मन (शुक्र, 03/18/2011 - 11:48)पहिल्या भागात दिलेल्या भरभरुन प्रतिसादांसाठी, सुचवलेल्या दुरुस्त्यांसाठी सर्व वाचकांचे आभार.
पहिला भाग.:- http://mr.upakram.org/node/3196.
मालिकेच्या नावातही ह्या भागापासुन दुरुस्ती करतोय.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग १)
प्रेषक मन (बुध, 03/16/2011 - 13:09)बस. नीट लिहूयात ह्यावर म्हणून कित्येक दिवस थांबलो. पण तशी बांधणी/रचना करताच येत नाहीये.
सतीची प्रथा आणि अकबर
प्रेषक प्रियाली (मंगळ, 03/15/2011 - 00:35)नुकताच अकबराचा विषय निघाला होता म्हणून माहितीच्या एका तुकड्याची आठवण झाली. आठवण पुन्हा चाळली आणि उपक्रमावर देत आहे.
--------
अंश ईश्वराचा
प्रेषक प्रियाली (मंगळ, 02/08/2011 - 02:27)मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे.
थोर स्वतंत्रता सेनानी - राणी गाईदिन्ल्यू
प्रेषक विश्वास कल्याणकर (शुक्र, 02/04/2011 - 06:05)आपल्या भारतियांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठि लढलेल्या स्वांतंत्र्ययोध्यांबद्दल बर्यापैकी माहिती असते. परंतु आपल्याच देशातील पण ईशान्य भारतातील स्वतंत्रता सेनानी याबद्दल माहिती अजिबातच नसते.
पानिपताची मराठी भाषेला देणगी
प्रेषक चिंतातुर जंतू (सोम, 01/03/2011 - 17:56)पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला.
असा हा पुर्वांचल
प्रेषक विश्वास कल्याणकर (मंगळ, 12/28/2010 - 06:18)पूर्वांचल छात्र शिबीर २०१०, नांदेडच्या निमित्ताने प्रकाशित झालेली 'सांकव' ही स्मरणिका माझ्या वाचनात नुकतिच आली. पूर्वांचलातील बांधवांच्या प्रती आपल्या मनातील एकात्मतेचे हृदयबंध बळकट व्हावेत.
अलेक्झांडर आणि पुरु युद्ध -२
प्रेषक प्रियाली (रवि, 12/26/2010 - 00:32)अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १
भारतीय स्वारीचा वृत्तांत
अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १
प्रेषक प्रियाली (शनि, 12/25/2010 - 23:35)इतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे.
महेश्वर व पुण्यश्लोक अहिल्याबाइ होळकर्
प्रेषक विश्वास कल्याणकर (शुक्र, 12/24/2010 - 07:53)नर्मदाप्रसाद् यांचे "श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग" या नावानी नर्मदा परिक्रमेवर् फार सुंदर् व माहितीपर पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. महेश्वर संदर्भात दिलेली माहिती मी त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे."
माझा नुकताच झालेला प्रवास
प्रेषक विश्वास कल्याणकर (मंगळ, 12/21/2010 - 09:18)पुणे- इंदुर गाडीने मी ७ डिसेंबरला गाडीत बसलो. सोबत सगळे म.प्र.चे कुटुंब होते आणी मी एकटाच पुणेरी. नाही म्हटले तरि थोडा पुणेरी खाष्टपणा माझ्या अंगात भिनत चालला आहे. केवळ दोन वर्षात. मला देवास ला जायचे होते म्हणजे उद्या सकाळी ८.३० ला.
मराठे शाहीतील मद्यपान विषयक धोरण आणि शासन व्यवस्था
प्रेषक विश्वास कल्याणकर (सोम, 11/15/2010 - 05:51)संपुर्ण भारतात महाराष्ट्र हे सर्वच बाबतित पुढारलेले राज्य समजले जाते. मग मद्य प्राशनाबाबत देखील ते मागे कसे राहू शकेल.
मरणोत्तर देहाचं तत्त्वज्ञान?
प्रेषक चिंतातुर जंतू (शुक्र, 11/12/2010 - 04:55)श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'मध्ये 'मरणोत्तर' नावाचा एक गमतीशीर लेख आहे. मरणोत्तर कर्मकांडं आणि त्यांमागचं तत्त्वज्ञान (मुख्यतः हिंदू) यांची त्यात खास कोल्हटकरी शैलीतून खिल्ली उडवली आहे.
रत्ने, मणी, खडे - एक संकलन - भाग दोन
प्रेषक चित्रा (गुरू, 06/03/2010 - 14:59)या आधीच्या संकलनात उद्दिष्ट लिहीलेच आहे... अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे.
चार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल?
प्रेषक ज्ञानेश... (गुरू, 06/03/2010 - 06:38)"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?"
'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.
मिसळ
प्रेषक हेमन्त (शुक्र, 05/28/2010 - 05:59)कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकल
रत्ने, मणी, खडे - एक संकलन
प्रेषक चित्रा (मंगळ, 05/25/2010 - 18:16)अलिकडेच झालेल्या रामायण काळातील चर्चेमध्ये जनकाने सीतेच्या लग्नानंतर तिला सासरी जाताना दासी दिल्या असे वाचले.
पेशवेकालीन तांडव गणपती
प्रेषक विश्वास कल्याणकर (सोम, 05/10/2010 - 03:20)इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे.
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३
प्रेषक प्रियाली (सोम, 04/26/2010 - 17:32)गरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात.
वडार समाज : इतिहास आणि संस्कृती
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (रवि, 04/18/2010 - 06:25)महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते.
अवतार, पुनर्जन्म वगैरे
प्रेषक प्रियाली (सोम, 04/12/2010 - 14:35)अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने
प्रेषक नवीन (मंगळ, 03/16/2010 - 07:35)आज गुढी पाडवा आहे. 'नवीन' वर्षानिमित्त सर्व उपक्रमींना हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच खालील दोन विषयांवर उपक्रमींची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव.
आमचे पूर्वज महान होते
प्रेषक प्रियाली (सोम, 02/08/2010 - 23:26)बाजूच्या एका चर्चेत काही सदस्यांचे प्रतिसाद नुकतेच वाचले. त्यात श्री. धम्मकलाडू म्हणतात -
वेडात वीर दौडले... तीनशे सात
प्रेषक प्रियाली (शुक्र, 12/18/2009 - 13:34)वेडात मराठे वीर दौडले सात
पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
प्रेषक प्रियाली (गुरू, 11/26/2009 - 16:51)खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार
पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल
प्रेषक धम्मकलाडू (शुक्र, 11/13/2009 - 09:18)पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल ह्यांच्याबद्दल माहिती हवी आहे.
प्रश्न:
उचललेस तू मीठ मुठभर
प्रेषक भोचक (गुरू, 11/12/2009 - 11:28)यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.

