आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने...
ह्या समुदाय मराठी भाषा, बोलीभाषा, वाक्प्रचार, म्हणी, शब्दांच्या व्युत्पत्ती आदी विषयांवरील रंजक-रोचक देवाणघेवाण, सवालजवाब आणि चर्चा व्हावी. भाषेवर, शब्दांवर प्रेम करणाऱ्या आणि भाषाव्यवहाराकडे चिकित्सकपणे (दुसऱ्या शब्दांत कीसपाडूपणे) बघणाऱ्या सर्वांचे इथे हार्दिक स्वागत.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने
प्रेषक अरविंद कोल्हटकर (मंगळ, 01/24/2012 - 13:58)मराठी भाषेत शेकडो शब्द आणि वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत जातो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
नशीबात नसलेली पुस्तके
प्रेषक सन्जोप राव (रवि, 01/15/2012 - 06:38)महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या अंकातला हृषिकेश गुप्ते यांचा हा लेख दोन कारणांनी वाचण्यासारखा आहे.
दिवाळी अंक- वाचलेले, चाळलेले, न वाचलेले
प्रेषक सन्जोप राव (सोम, 10/31/2011 - 11:31)सालाबादाप्रमाणे दिवाळी आली व गेली. पहाट झाली भैरु उठला वगैरे. आता शिल्लक चिवड्या-चकल्यांची जशी नंतर एक सणसणीत तिखट मिसळ जमून जाते त्याप्रमाणे छापील दिवाळी अंकाची एक पारंपारिक खमंग चर्चा व्हायला हवी.
कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का?
प्रेषक प्रियाली (शुक्र, 09/23/2011 - 12:35)बॉर्डर्स ही अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकांनाची साखळी शेवटचा आचका देऊन गेल्या आठवड्यात गार झाली. गेले काही महिने तेथील माल कमी दराने विकला जातो आहे हे सांगणार्या इमेल्स येत असत.
११-१२ वर्षांच्या मुलांसाठी पुस्तके सुचवा
प्रेषक चिंतातुर जंतू (बुध, 07/27/2011 - 15:04)११-१२ वर्षांच्या किंवा किंचित वरच्या वयाच्या मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं कुणी सचवू शकेल का? गरज काहीशी अशी आहे:
- पुस्तकं इंग्रजी भाषेत उपलब्ध असावीत. (पण इतर भाषांतून केलेली भाषांतरं चालतील.)
'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक
प्रेषक प्रियाली (मंगळ, 07/12/2011 - 17:45)मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक 'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित झाला असून त्याचा दुवा उपक्रमावर डावीकडे दिलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
लोक काय वाचतात?
प्रेषक सन्जोप राव (मंगळ, 04/26/2011 - 05:57)जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ’लोकसत्ता’ ने २४ एप्रिलच्या अंकात महाराष्ट्रातील वाचनसंस्कृतीची एक पहाणी प्रसिद्ध केली आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो
प्रेषक सन्जोप राव (सोम, 03/28/2011 - 11:53)विविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते.
आँ?! हे काय हो तुकोबा?
प्रेषक मन (गुरू, 03/17/2011 - 16:26)अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.
माझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'
प्रेषक सन्जोप राव (गुरू, 02/17/2011 - 16:27)' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते?' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट?' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो.
पानिपताची मराठी भाषेला देणगी
प्रेषक चिंतातुर जंतू (सोम, 01/03/2011 - 17:56)पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला.
अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार
प्रेषक चिंतातुर जंतू (बुध, 12/22/2010 - 12:54)भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.
प्रेषक सुशान्त (गुरू, 08/26/2010 - 04:27)(ह्या लेखातला प्रतिसाद लेख म्हणून वेगळा करण्यात आला आहे.--संपादक)
'भाषा आणि जीवन'चा पावसाळा २०१० अंक उपलब्ध
प्रेषक चित्तरंजन (गुरू, 07/29/2010 - 18:13)
मुखपृष्ठ : रविमुकुल आदरांजली
संपादकीय/कवितेची भाषा/प्र०ना० परांजपे
एक सकाळ फळाफुलांची..
प्रेषक हेमन्त (गुरू, 07/29/2010 - 13:19)नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री.
....मुळ 'अन्' प्रत्यय मराठीतला कि इंग्रजीतला?
प्रेषक हेमन्त (शनि, 06/12/2010 - 06:59)बर्याच मराठी व इंग्रजी नकारार्थी शब्दांना 'अन्' किंवा ' 'un' हा एकच प्रत्यय असतो.
उदा. मराठीत अनादर, अनधिक्रुत वगैरे
इंग्रजीत unavailable, unbeleivable etc.
मुळ 'अन्' प्रत्यय मराठीतला कि इंग्रजीतला?
मिसळ
प्रेषक हेमन्त (शुक्र, 05/28/2010 - 05:59)कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकल
पोलिटिकल करेक्टनेसला फाट्यावर मारायला हवे काय?
प्रेषक धम्मकलाडू (मंगळ, 05/04/2010 - 17:08)गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न भंडावतो आहे. एक काय खरे तर ह्यात अनेक प्रश्न आहेत. वैयक्तिक टिप्पणी म्हणजे काय? माणसाचा अपमान नेमका कोणत्या शब्दांनी होतो?
उपमा अलंकार्
प्रेषक harshaswami (मंगळ, 04/27/2010 - 13:50)मराठी भाषेला आकर्षक आणि मोहक बनवणारा हा अलंकार आहे. अलंकार! थोड्क्यात काय तर मराठी भाषेचे आभुषण!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
मराठी कवितेची बदलती भाषा
प्रेषक चित्तरंजन (शनि, 04/24/2010 - 11:21)मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १ मे रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.
मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश
प्रेषक चित्तरंजन (शुक्र, 04/02/2010 - 15:02)-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
काहि वाक्प्रयोग आणि अर्थ
प्रेषक ऋषिकेश (सोम, 02/01/2010 - 06:31)असे बरेच वाक्प्रयोग आहेत जे आपण सर्रास वापरतो पण त्याचा अर्थ नेहमी माहित असतोच असे नाहि. जसे मागे 'तुंबड्या लावणे' म्हणजे काय मला माहित नव्हते त्याची इथे (उपक्रमावर)चर्चा करून अंदाज आला.
इनोवेशन साठी मराठी शब्द ??
प्रेषक गौरी दाभोळकर (बुध, 12/30/2009 - 03:25)इनोवेशन ह्या शब्दासाठी चपखल मराठी शब्द आहे का?
सोहोनीन्च्या शब्दकोशामध्ये खालील दोन अर्थ सापडतात :
१. नवीन गोष्टी सुरू करणे
२. नवा उपक्रम, नवीन चाल, नूतन पद्धत
माझ्या आयडियाझ :
१. नूतनपद्धतीकरण
२. नवोपक्रम
तुमच्या आयडियाझ ?
शब्दांचा प्रवास
प्रेषक बाबासाहेब जगताप (गुरू, 12/10/2009 - 12:23)भाषेची गंमत अनुभवतांना आपल्या संग्रही भाषेचे ज्ञानही सहजपणाने जमा होते हे सांगतांना शांता शेळके यांनी राजीनामा या शब्दाचा गंमतीशीर प्रवास सांगितला आहे.
मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदत हवी आहे
प्रेषक चित्तरंजन (मंगळ, 12/08/2009 - 09:14)१ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चे संकेतस्थळ २००८ सालच्या महाराष्ट्रदिनी सुरू झाले.
पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
प्रेषक प्रियाली (गुरू, 11/26/2009 - 16:51)खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार
आणखी शब्द- अतिमानवी शक्ती
प्रेषक राधिका (गुरू, 11/05/2009 - 15:47)'अतिमानवी शक्ती' हा शब्दप्रयोग वाचून घाबरू नका. जिवंत माणसांच्या पलीकडील संकल्पना इथे अभिप्रेत आहेत. थोडक्यात काय, तर भूता-खेतांचे प्रकार, राक्षस, देव- देवता या संकल्पना आणि त्यांची नावे हवी आहेत.
नवा उपक्रम - भांडीकुंडी (२)
प्रेषक राधिका (बुध, 11/04/2009 - 16:25)मंडळी,
आधीच्या चर्चेत ५० प्रतिसाद झाले आहेत, त्यामुळे नवा भाग टाकते आहे. (एका दिवसांत ५० प्रतिसाद :ऑ) सर्वजण मस्त शब्द सुचवत आहेत, इथेही तेच चालू द्या.
राधिका
शब्दच्छल
प्रेषक पर्स्पेक्टिव (बुध, 09/02/2009 - 15:21)पुणेरी पर्याय या मूळ चर्चेतील काही प्रतिसाद येथे हलवण्यात येत आहेत. शाब्दिक शंका, शब्दच्छल यांवर यापुढे येथे चर्चा करता येईल. धन्यवाद!
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
रा.चिं.ढेरे यांचे संकेतस्थळ
प्रेषक सन्जोप राव (मंगळ, 07/21/2009 - 01:35)ज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके -८ मिरासदारी
प्रेषक सन्जोप राव (शनि, 06/13/2009 - 12:15)द. मा. मिरासदार हे मराठीतले आघाडीचे विनोदी लेखक. लोकप्रियता हा यशस्वी होण्याचा निकष लावायचा झाला तर अगदी यशस्वी लेखक. पण लोकप्रियता आणि दर्जा यांचे काही म्हणजे काही नाते नाही.
माझ्या संग्रहातील पुस्तके - ७ कुसुमगुंजा
प्रेषक सन्जोप राव (बुध, 06/10/2009 - 13:03)जी.ए.कुलकर्णींच्या काहीशा अपरिचित पुस्तकांपैकी एक म्हणजे १९८९ साली प्रकाशित झालेले 'कुसुमगुंजा' हे पुस्तक.
माझ्या संग्रहातील पुस्तके - ३
प्रेषक वाचक (बुध, 03/11/2009 - 18:12)वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे.
माझ्या संग्रहातील पुस्तके - २
प्रेषक मुक्तसुनीत (बुध, 02/25/2009 - 12:36)"माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग-भेद... आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी आणि विशिष्ट रोगांई पीडीत असणार्यांच्यातले भेद ...
माझ्या संग्रहातील पुस्तके - १
प्रेषक सन्जोप राव (शुक्र, 02/13/2009 - 05:00)प्रास्ताविक: वाचनाची आवड असलेल्या आपल्या सर्वांच्या घरी नेहमीची लोकप्रिय पुस्तके तर असतातच, पण आपल्याकडे आपल्याला आवडलेली अशी काही खास पुस्तके असतात. आपली अभिरुची, आपले अनुभव आणि आपली जीवनविषय दृष्टी (बापरे!
वान्-वंत आणि मान-मंत
प्रेषक वरदा (मंगळ, 01/27/2009 - 20:35)वान-वंत आणि मान-मंत हे प्रत्यय 'युक्त' ह्या अर्थी लागून अनेक शब्द तयार झाले आहेत. उदाहरणार्थ बुद्धिवान, शक्तिमान वगैरे.
मराठी शुद्धलेखनावर उपाय
प्रेषक सूर्यकांत डोळसे (रवि, 01/04/2009 - 19:07)१) कोणतीही भाषा ही बोलल्याप्रमाणे शंभर टक्के शुद्ध लिहीता येवु शकत नाही. हे भाषाशास्र मान्य करीत असतानाही शुद्धलेखनाचा आग्रह का धरला जातो?
निमत्रण
प्रेषक सलील वाघ (मंगळ, 12/16/2008 - 07:19)रेसकोर्स् आणि इतर कविता
धा जानेवारीला
प्रकाशित होतय
पत्रकार भवन मध्ये
सन्ध्याकाळी साडेपाचला
पुण्यात
वसन्त दत्तात्रय गुर्जर येणारेत
बाकीची कांम बाजूला टाकून
तुम्हीपण प्रकाशनाला यायचय
हेच फोर्मल इन्विटेशन

