गणित
गणित हा सगळ्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा गाभा आहे. गणित ही प्रगतीची भाषा आहे. मराठीत गणित या विषयाचे अत्याधुनिक ज्ञान यावे यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'गणित' हा समुदाय येथे सुरू करीत आहे.
येथे आपण पुढील रितीने सहभागी होऊ शकता -
१. गणित या विषयावर मराठीत लेखन करून,
२. गणिताचा मराठीत प्रचार कसा करता येईल त्याबाबत चर्चा करून,
३. गणित जगतात नविन काय चालले आहे याच्या बातम्यांचे दुवे देवून,
४. या यादित भर घालून, :)
चला, मायमराठीत गणितावर उत्तमोत्तम उपक्रम चालवू या!
दिवेआगरचा गणपती
प्रेषक निखिल जोशी (गुरू, 05/03/2012 - 17:52)केवळ एका बातमीच्या आधारे हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे: दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती? या बातमीत असे नमूद केलेले आहे की "घोडके सराफ यांच्यातर्फे मूळ मूर्तीची चांदीची प्रतिकृती दिवेआगर देवस्थानला दिली जाणार आहे. ... मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे."
भारतीय गणित
प्रेषक अनिल् साम्बरे (सोम, 07/25/2011 - 07:04)भारतीय गणितज्ञांच्या कर्तृत्वाचा रोचक परिचय
कोडे: घड्याळे आणि इमारत
प्रेषक निखिल जोशी (शुक्र, 12/17/2010 - 03:13)समजा आपल्याकडे एकाच प्रकारची अनेक घड्याळे आहेत. एका १०० मजली इमारतीच्या विशिष्ट क्ष व्या मजल्यावरून खाली पडले तर कोणतेही घड्याळ फुटेल, क्ष पेक्षा वरच्या कोणत्याही मजल्यावरून खाली पडले तरी कोणतेही घड्याळ फुटेल. क्ष पेक्षा खालच्या कोणत्याही मजल्यावरून खाली पडले तर मात्र कोणतेही घड्याळ फुटणार नाही. क्ष हा मजला कोणता ते शोधावयाचे आहे.
वर्गमूलावली
प्रेषक निखिल जोशी (रवि, 11/14/2010 - 15:21)आत्म्याविषयीच्या धाग्यात मात्र्योष्का बाहुल्यांचा उल्लेख वाचून शाळेत अभ्यासलेल्या "करणीची (सर्ड) उकल करा" कोड्यांच्या एका प्रकाराचे स्मरण झाले.
√२+√२+√२+ ... या करणीची उकल कशी करावी?
आग्र्याहून सुटका (एक कोडे)
प्रेषक वैभव कुलकर्णी (बुध, 04/16/2008 - 15:16)आग्र्याच्या तुरुंगात १००० खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत १ कैदी आहे. खोल्यांचे क्रमांक १ ते १००० असे आहेत. प्रजासत्तकदिनानिमित्त काहीजणांना मुक्त करायचे होते. त्यासाठी एक क्लृप्ती लढवली.
सिद्ध करा
प्रेषक यनावाला (गुरू, 08/30/2007 - 16:43)(अ,ब,क) या तीन वास्तव संख्या (रियल नंबर्स) असून त्यांची बेरीज तीन (३) आहे.
{(अ+ब+क)}=३} .तर :
१.सिद्ध करा की (अब+बक+कअ) ही बेरीज साडेचार पेक्षा कमी आहे.
२. सिद्ध करा की (अब+बक+कअ) ही बेरीज ३ अथवा त्याहून (३ हून) कमी आहे.
आकडेमोडीची एक करामत.
प्रेषक शरद् कोर्डे (गुरू, 08/30/2007 - 11:46)समजा मी एक चार आकडी संख्या मांडली.
प्रज्ञापराक्रमी डॉ. टी. व्ही. रामन
प्रेषक शैलेश (शुक्र, 06/29/2007 - 15:22)आयुष्यात अमुक एका गोष्टीच्या अभावाने प्रगती होऊ न शकल्याची तक्रार करणारी बरीच मंडळी पहायला मिळतात. परंतू, येणा-या अडचणींवर मात करून बहुमोल कामगिरी करणारे ‘पराक्रमी’ या पदवीने
विज्ञान कथेंतील जग.
प्रेषक शरद् कोर्डे (शुक्र, 06/08/2007 - 10:48)आपले जग, खरे तर अवकाश (स्पेस्) त्रिमिति आहे असे म्हंटले जाते. पण अवकाश खरोखरच त्रिमिति आहे की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे व स्थानांमुळे ते तसे वाटते?
गणिताला महत्त्व देऊ या.
प्रेषक शरद् कोर्डे (बुध, 05/09/2007 - 13:56)सध्या प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांच्या बाबतींत जरा ज्यास्तच हळवी झाली आहेत. जरा कुठे विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल असे दिसले की त्यांच्या मनावरील ताणाचा मुद्दा उपस्थित केला जातो.
गणिताची आवड
प्रेषक केशव (मंगळ, 05/01/2007 - 04:57)'गंणित ' हा समुदाय निर्माण / स्थापन केल्याबद्दल शैलेश यांचे अभिनंदन !
आकड्यांच्या गमतीजमती
प्रेषक शरद् कोर्डे (रवि, 04/29/2007 - 08:47)अ) बहुतेकांना माहीत असलेला गणिती संबंध :
(३)चा वर्ग + (४)चा वर्ग = (५)चा वर्ग
ब) फारसा माहीत नसलेला गणिती संबंध :
(३)चा घन + (४)चा घन + (५)चा घन = (६)चा घन
क) एकाच्या गमती
(१) चा वर्ग १
(११) चा वर्ग १२१
बूलियन तर्कशास्त्र: आणि,किंवा,नाही इ.इ.
प्रेषक अनु (गुरू, 04/26/2007 - 11:03)"गॅस संपला आहे? मग खाणं घरी मागवू किंवा मग बाहेर जेवायला जाऊ"
(खाणं घरी मागवलं काय किंवा बाहेर जेवलो काय, निकाल एकच. जेवणाची व्यवस्था झाली.)
न सुटलेली गणिते?
प्रेषक शरद् कोर्डे (गुरू, 04/26/2007 - 08:00)मी कॉलेजांत असतांना (१९६० च्या दशकांत) माझ्या ऐकण्यांत असे आले होते की गणितांतील काही प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. जसे
२००७ चा ऍबेल पुरस्कार
प्रेषक शैलेश (शुक्र, 04/13/2007 - 18:10)भारतीय वंशाचे अमेरिकन गणिती श्री. श्रीनिवास एस. आर. वर्धन यांना २००७ चा गणितातील ऍबेल पुरस्कार घोषित झाला आहे.
गणित सोडवा.
प्रेषक रंग माझा वेगळा (शनि, 03/31/2007 - 14:05)हे एक एकसामयिक समिकरण आहे.
x2+y=7
x+y2=11
याचे उत्तर आहे:-
x=2 आणि y=3
कुणी हे गणित पायर्या-पायर्यांनी (stepwise method) सोडवून देईल का?
(x2 म्हणजे x चा वर्ग हे सांगण्याची आवश्यकता नाहीच.)
कुशल संख्याशास्त्र
प्रेषक एकलव्य (शनि, 03/31/2007 - 06:27)व्यक्तिमत्व चाचण्यांमधील प्रश्न बर्याचदा आपल्याला अगदी तर्हेवाईक आणि संदर्भहीन वाटतात. मात्र इतके असूनही बहुतेकवेळा या चाचण्या आपली खरी ओळख आपल्याला करून देतात.
अयुक्लीडीय भूमिती
प्रेषक अनु (शुक्र, 03/23/2007 - 05:43)'दोन समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत.' -युक्लीडचा सिद्धांत.
'असे काही नाही, त्या एकमेकांना छेदतीलही.'-कोणीतरी.
संख्या
प्रेषक चाणक्य (गुरू, 03/22/2007 - 12:55)मित्र हो,
आपण संख्यांपासून सुरुवात करू. मला काही प्रश्न आहेत.
संख्यांचे प्रकार कोणते?
० ते ९ याला कोणत्या प्रकारच्या संख्या म्हणायच्या?
शाळेत हे सगळं काही शिकलो होतो. पण आता गंज चढला आहे. मदत करा परत् एकदा शिकायला...
प्राथमिक गणित
प्रेषक चाणक्य (बुध, 03/21/2007 - 11:06)येथे गणिताबद्दल समुदाय पाहुन आनंद झाला. बरेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षणात गणिताची भीती घेतात अन् मग गणिताची भीती काही जात नाही. आपण् येथे अगदि बाळबोध गणिता पासून चर्चा करूयात का?
गणिती संज्ञांसाठी प्रतिशब्द
प्रेषक शैलेश (शनि, 03/17/2007 - 18:16)गणितासाठी मराठीत काही प्रतिशब्द योजित आहे. या शब्दांच्या वापराचे एक उदाहरण म्हणून विसंधी गणितातील (Discrete Mathematics) एका इंग्रजी उताऱ्याचे स्वैर रूपांतर येथे देत आहे. मूळ उताऱ्यात उपवनाची उपमा घालून तो रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे -

