उत्पादन - संशोधन
आपल्यापैकी बहुतेक जण कोणत्यातरी उत्पादनाशी प्रत्यक्षरीत्या अथवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित असतील. हे सांगायचा मुद्दा असा की आपण भारतीय / अनिवासी भारतीय आपली बुद्धी अनेकदा कोणा अभारतीय संस्थेच्या उप्तादनाच्या संशोधनासाठी खर्च करतो. आपल्यामध्ये नवे उत्पादन बनवण्याची क्षमता आहे पण आपण स्वतः ते बनवत नाही. यासाठी कदाचित वेगवेगळ्या मर्यादा असतील. पण उपक्रमासारख्या व्यासपीठाने आपल्यासारख्या समविचारी मराठीजनांना एकत्र आणलं आहे. याचाच फायदा घेउन आपण सुद्धा एखादे उप्तादन बनवलं तर? ॐकार ने गमभन बनवून तर हे सिद्धच केलं आहे की आपल्याला असे काही करणे मुळीच अशक्य नाही. तर, ज्यांना असे काही नवे करण्याची इच्छा, उर्मी आहे त्या सर्वांसाठी हा समुदाय आहे. आपली संकल्पना काही असु देत. एखादे शेतीचे औजार, स्वयंपाक घरातले एखादे उपकरण की एखादा महासंगणक, थोडक्यात आपले आयुष्य सोपे करणारे कोणतेही तंत्रज्ञान. आपल्याकडे जर अशा काही संकल्पना असतील तर त्या येथे जरूर मांडा. आपण सर्व मिळून त्यावर चर्चा करू, शक्याशक्यता तपासू. जर शक्य असेल तर एकत्र येउन एखादा खराखुरा उपक्रम राबवू. चला तर मग. मांडा आपल्या कल्पना. शेवटी गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडुन खाल्ली काय?
टेलिमेडिसिन् ला पर्यायि शब्द सुचवा
प्रेषक वैदर्भिय (बुध, 05/12/2010 - 12:48)क्रुपया टेलिमेडिसिन् ला पर्यायि मरठि शब्द सुचवा.
टेलिमेडिसिन्चे प्रत्यक्शिक् येथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=laapmsDNDAg
ंइ पहिल्यान्दआ मरठिमधे लिहिन्यचआ प्रयत्न करित् आहे.
ंअला हे सन्केत्स्थल् खुप् अवडले
इलेक्ट्रॉनिक कचरा - समस्या
प्रेषक चाणक्य (मंगळ, 03/31/2009 - 13:16)नॅनोच्या निमित्ताने... या चर्चेने या विषयला जन्म दिला असे म्हणायला हरकत नाही. चारचाकी कमी किमतीत तयार होणार असल्याने अनेकांना पायाभुत सुविधांवरचा ताण आणि प्रदुषण यांची काळजी वाटू लागली.
उत्पादन संशोधन - ड्रुपल मोड्युल बनवता येईल का?
प्रेषक चाणक्य (सोम, 03/09/2009 - 05:18)नमस्कार मंडळी,

