छायाचित्रण - प्रकाशचित्रण

अनेक छायाचित्रे पाहिली की आपल्याला आनंद होतो. अनेकदा असं वाटून जातं की मी इतके सुंदर छायाचित्र काढू शकतो का? कसे काढले असेल? कोणता कॅमेरा वापरला असेल?
मी सुद्धा एक कॅमेरा घेतो/घेते आणि सुरु करते. पण कोणता घ्यावा? फिल्म कि डिजीटल? पॉईंट अँड शुट की एस एल आर? यात नेमका फरक काय? ऍपर्चर म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याच सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी, या कलेची अनेक अंगे समजून घेण्यासाठी आणि छायाचित्रे-छायाचित्रण याचा आनंद लुटण्यासाठी हा समुदाय आहे.

छायाचित्रात-चित्रणात रस असणार्‍या प्रत्येकासाठी हा समुदाय आहे.

सदस्यांनी छायाचित्र-छायाचित्रण या संबंधीत माहितीपर लेख, चर्चा इत्यादी उपक्रमातून सहभाग घेणे अपेक्षीत आहे.

किलर व्हेलचा हल्ला

नुकतीच ओरलँडो, सी वर्ल्डमध्ये किलर व्हेलने खेळादरम्यान एका जुण्या जाणत्या ट्रेनरला ( Dawn Brancheau) ठार केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मी सहजच म्हणून माझ्याकडील जुने फोटो चाळले आणि मला डॉनचा खेळादरम्यानचा फोटो मिळाला.

मंगोलीयाचा पाहुणा!

bar headed gose

ब्राह्मणी घार

ब्राह्मणी घार

ब्राह्मणी घार! खडकवासला धरणाच्या जवळ सकाळी सकाळी घेतलेला फोटो!
--भालचंद्र पुजारी!

नसतेस घरी तू जेव्हा .....

नसतेस घरी तू जेव्हा .....

हे चित्र कॅनॉन् रिबेल एक्स् एस् आय् व ५० मिमि/१.८ लेन्स् वापरून काढले आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

- मित्र

व्यर्थ न हो बलिदान्...

व्यर्थ न हो बलिदान...शूरा मी वंदिले....

२६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!

द्येवाच्या वाटेवर ..

खंडेरायाचा गड. वाट चढी. म्हणून दर्शनाला निघालेला गडावर निघालेला हा वाघ्या वाईच थांबला आणि निवांत झोपलेल्या आजीबाई शेजारी बसला.
कॅमेरा - मोबाईलचा साधा :)
स्थळ: मल्हार देवरगुड्डा, ता. राणीबेन्नूर, जि. धारवाड, कर्नाटक.

खिडकीतली फुलदाणी

काल हे चित्र काढले. बसल्याबसल्या डोळ्यासमोर ही चौकट दिसली. कॅमेरा, ट्रायपॉड तयार होता, सहज जमले आणि मलाच आवडले. तब्बल २ सेकंदाचे एक्सपोजर (मराठी) वापरले आहे.

पर्पल डेझी

जांभळट गुलाबी रंगाची डेझीची फुले फार आकर्षक दिसतात.

फॉल

भारतात जसा 'नेमेची येतो मग पावसाळा' म्हणतो तसे अमेरिकेत 'नेमेची येतो मग फॉल असे' म्हणावेसे वाटते. उन्हाळा संपून थंडीचा कडाका वाढणार ह्याने उदास वाटत असले तरी चहुबाजुंनी चाललेही ही रंगांची उधळण बघून प्रसन्न वाटायला लागते.

सूर्यास्त

दिवाळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी हाजीअलीजवळून जात असताना हा सूर्यास्त दिसला.
पॉईंट आणि शूट कॅमे-याने प्रकाशचित्र टिपल्यामुळे चित्रात थोडी 'खसखस' (नॉईज) दिसतेय. ती साफ करताना पाण्याचे टेक्श्चर निघून गेले आहे :-(

वास्तूचित्र

मुंबईतील वांद्रे उपनगरात हे प्रसिद्ध माऊट मेरी चर्च वसलेलं आहे. १९व्या शतकात मदर मेरीच्या सन्मानार्थ हे रोमन कॅथॉलिक शैलीतील चर्च बांधण्यात आले.

जुन्याचे नवे रुप्

जुने फोटो पुन्हा बघण्यात किंवा मुलांना दाखवण्यात एक गंमत असते. एकाने त्याच्या आईचा फोटो साफ करून मागितला.

व्यक्तिचित्र

मुंबईमध्ये हाजीअली जवळ टिपलेलं पोर्ट्रेट! ४०० ए.एस्.ए. फुजी कलर टीपी वापरली आहे. स्कॅन करून संगणकात फोटो-एडिटरमध्ये कृष्ण-धवल रूपांतरण केलं आहे. चेह-यावरील भाव अधोरेखित व्हावे म्हणून इतर भागावर थोडंसं बर्निंग केले आहे.

छायाचित्र: मिसीसिप्पी

जुनी चित्रे धुंडाळत असताना हे चित्र दिसले.

दिडेक वर्षापूर्वी मिसीसिप्पी नदीला पूर येउन पाणी पात्राच्या बाहेर आलं होतं. पाण्याच्या अवाढव्य विस्तारापुढे नेहमी भव्य दिसणारा पूल अगदी छोटासा दिसू लागला.

डिजीटल् इमेज् रिस्टोरेशन्

मी १९९४ ला मस्कत ओमान, डिजील स्टुडिओ सुरु केला होता, तेव्हा चे काही नमुने.
फोटो रिस्टोरेशन आणि संपादन


ओळख पत्राचा फोटो रिस्टोरेशन

चुकलेला क्षण, म्हातारा आणि बिडी

तल्लिन होऊन हा म्हातारा विडी फुकत होता. काही सेकंदांनी तो क्षण चुकला आणि असा फोटु आला.
DSC02293

छायाचित्र : रोषणाई

कितीही वेळा गेले तरी शिकागो शहराची रोषणाई नेहमीच भुलवुन टाकते. न्युयॉर्कच्या तुलनेत शिकागोतील उत्तुंग इमारती आधुनिक असल्याने जास्त सुंदर दिसतात.

छायाचित्र : चिमुरडी

लहान मुलांचे फोटो काढण्या इतका आनंददायी दुसरा प्रकार नाही. असेच भटकत असताना अचानक ही चिमुरडी दिसली. डोळ्यातील भाव स्पष्ट येण्यासाठी थोडेसे ओवरएक्स्पोज करुन हे चित्र काढले.

दगड, देव आणि कुंपण

एक होता दगड. मग त्याला कोणीतरी शेंदूर फासला. मग लोक त्याला देव म्हणू लागले. एक कुंपण होतंच.

विरक्ती

दुकानांच्या बंद दारांकडे तोंड करून जगाकडे फिरवलेली पाठ. विरक्तीचा भगवा रंग. शांत झोप.

पण जगाकडे पाठ फिरवून चक्रातून सुटका होत नाही.

सोनी अल्फा २०० के की कॅनन १०००डी

सोनी अल्फा २०० के व कॅनन १०००डी यांपैकी कुठला पर्याय निवडावा.
मान्यवरांनी मार्गदर्शन करावे... या प्रदेशात मी नवा प्राणी आहे..

छायाचित्रः <नाव सुचवा>

एकदा कँटीनमधून पुन्हा कार्यस्थळाकडे जात असताना ऑफीसमधे पुढील ड्रुश्य दिसलं.. हातातील सोनी एरिक्सन डब्लू-७००आय ने तो क्षण टिपला आहे

या चित्राला काय नाव द्यावं ते समजेना.. तुम्हीच सुचवा

प्रवास

पुणे विद्यापीठाच्या आवारात,

..... या नावाचा माणूस पंढरपूरपासून पुण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या घरातल्या भाऊबंदकीबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या भणंग आयुष्याबद्दल काहीतरी सांगत असतो,

कॅमेरा रॉ फाईल्स

कॅमेरा रॉ फ़ाईल्स -२

रॉ फ़ाईल्स

कॅमेरा रॉ फ़ाईल्स

बदक

हे बदक छानपैकी ऊन शेकत बसले होते. मी जवळ जाताच सावध झाले.
तांत्रीक बाबी:
शटर स्पीड : १/२५०
ऍपरचर : ५.६
ISO : १००
कॅमेरा : Canon EOS 350 D
लेन्स : Canon EF 70-300 IS USM
रॉ मधे खेचला आणि कलर करेक्शन, शार्पनेस टाकला.
प्रतिक्रीया आणि सुधारणा कळवावी.

-अनूप

झाड

ऍबस्ट्रॅक्ट सारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न.

फोकल लेंथ: २१ मिमी
ऍपर्चरः ३.५
आयएसओ: ८००

संध्याकाळ

एका संध्याकाळी काढलेला ह्या टेकडी चा फोटो. प्रतिक्रिया कळवा.

सुर्य मावळत होता आणि माझ्या मागे होता.
ISO - 100
Shutter Speed - 1/320
Aperture 8.0

कॅमेरा निवडीबाबत मदत -

नमस्कार,

सर्वप्रथम मी माझी त्रुटी मान्य करतो की मला या प्रस्तावामधे लिहायला फार कमी मराठी शब्द सापडतील.

माझ्याकडे पॅनासोनिक डीएम् सी एफ् झेड् २८ हा सूपर झूम आणि ब्रिज या प्रकारामधला कॅमेरा आहे. यामधे DSLR सारखी बरीच Functions आहेत.

छायाचित्र टिका..

बर्‍याच काळानंतर एक छायाचित्र आपल्या सर्वांच्या प्रतिसादासाठी देत आहे.....

तांत्रिक माहीती -

प्रकशचित्र संपादन प्रणाली

नमस्कार,
मी प्रकाशचित्र संपादनासाठी विंडोज विस्टावर किंवा उबंटुवर वापरता येणारी मोफत संगणक प्रणाली शोधत आहे.
पिकासामध्ये बर्‍याच संपादनसुविधांचा अभाव जाणवतो आणि फोटोशॉप विकत घेणे मला परवड्णारे नाही.

ऍल्कट्रॅझ तुरुंगातील खिडक्या

ऍल्कट्रॅझ तुरुंगातील एकांतवासाची (सॉलिटरी कनफाइनमेंट) झालेल्या कैद्यांना 'डी' ब्लॉकमध्ये ठेवत. त्यांच्या छोट्या-छोट्या पिंजर्‍यांच्या गजातून संध्याकाळी त्यांना हे दृश्य दिसले असू शकेल.

मोगरा फुलला...

मित्रांनो,
गेल्या वेळी प्रकाशित केलेली छायाचित्रे काही तांत्रीक अडचणी मुळे दिसू शकली नाहीत.
तिच छायाचित्रे पुन्हा प्रकाशित करतोय.

सर्वांना घरच्या मोगर्‍याची भेट !!

-: दवबिंदू :-

-: दवबिंदू :-

आज सकाळी ऑफिसच्या बाहेर घेतलेले हे प्रकाशचित्र. . . .

दवबिंदू

. . . .

मोगरा फुलला. . .

मोगरा फुलला. . .

सर्वांना घरच्या मोगर्‍याची भेट !!


झाली फुले कळयांची

छायाचित्र - घुमट-घुमट्या

हल्लीच विजापुरला गेलो होतो तेव्हा तेथील गोलघुमटाच्या मिनारावरील छोट्या घुमट-घुमट्यांचे हे छायाचित्र काढले.

घुमट-घुमट्यां
घुमट-घुमट्या

शेवग्याची फुले, कोळी

शेवग्याची फुले...

shevga

. . . . .

छायाचित्र : एकाग्र..

नाशिकच्या काळाराम मंदीरात एकाग्र चित्ताने पठण करत असलेले साधुबाबा.

चित्राविषयी अभिप्राय/ सुचना/ टिका जरूर लिहा

तांत्रिक माहिती :

रोजसारखी एक नवी पहाट: सुर्योदय छायाचित्र टीका

नमस्कार मंडळी,

सुर्योदयाचे व सुर्यास्ताचे फोटो आपल्याला सगळ्यांनाच काढायला व बघायला आवडतात. विषयच तसा आहे तो.
सुर्योदयाबरोबर व सुर्यास्ताबरोबर नेहमी काही ना काही भावना, आठवणी जोडलेल्या असतात.
हे बघा एका सुर्योदयाचे चित्र.

भिंगरी

भिंगरी अर्थात Wire tailed swallow!

ह्याच पक्ष्याचे एक फारच सुरेख छायाचित्र धृव ह्यांनी पुर्वी टाकले होते!
तरिही हा पक्षीच इतका लोभस आहे की ह्याचे अजुन एक छायाचित्र टाकल्याशिवाय राहवले नाही!

युरेशियन मार्श हॅरिअर!

Eurasian marsh harrier
Eurasian marsh harrier
Eurasian marsh harrier
Eurasian marsh harrier

छायाचित्र् (आणि संपादित् छायाचित्र) टीका

परवा ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी नावाच्या एका जागेवरून लॉस अँजलिस डाऊनटाऊनचा फोटो काढला. त्या फोटोवरून मला ही कल्पना सुचली. मूळ फोटो आणि संपादित केलेला फोटो खाली देत आहे. संपादनासाठी जिंप ही मुक्तस्रोत प्रणाली वापरली आहे.

छायाचित्र : घर थकलेले सन्यासी..

बरेच दिवस ह्या १९व्या शतकातल्या व्हिक्टोरीयन शैलीत बांधलेल्या घराचा फोटो काढायचे मनात होते.

शेवटी आज जाऊन काढून आलो...

कसा वाटला ते जरूर कळवा.

छायाचित्र टिका

नमस्कार मंडळी.....
चित्राना मिळणारा प्रतिसाद पाहून नवीन छायाचित्रे काढण्याचा उत्साह वाढत आहे.

Birds

छायाचित्रण- माझे काही प्रयत्न २

मित्रांनो,
उपक्रम वर हा माझा २रा प्रयत्न.

चिऊताईचं पिल्लु..

छायाचित्र टिका!

रोहित

पक्ष्यांचे लक्ष थवे! गगनाला पंख नवे! -ना. धों. महानोर

रोहित पक्षी अर्थातच फ्लेमिंगो!

छायाचित्र - माझे काही प्रयत्न

छायाचित्रण - माझे काही प्रयत्न

जाणकारानी मार्गदर्शन करावे

रानफुल . . .

Raan Phul

छायाचित्र टिका...

नमस्कार,

आज सकाळी भटकत असताना हे छायाचित्र काढता आले. कसे वाटले सांगावे.
याच माध्यमातून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

छायाचित्र टीका

nikko

निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळा चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगला आला.

छायाचित्र् - पोकर्

छायाचित्रणाचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटतो, ते कृपया सांगावे.

छायाचित्र विषय - पोकर आणि संबंधित साहित्य

छायाचित्र टीका: सांयकाळच्या रंगछटा

नमस्कार मंडळी,

औरंगाबद शहराजवळच्या म्हैसमाळ या ठिकाणाला काही दिवसापुर्वी भेट दिली. मस्त जागा आहे. शहराच्या गजबाटापसुन लांब व सुरेख अशी जागा. येथे एक बालाजी मंदिर आहे. सुर्यास्ताच्या वेळी येथे काढलेला हा फोटो.

कोळ्याचे जाळे

कधी वाटते आपले शत्रू कोळ्यासारखे आहेत - त्यांचे जवळजवळ अदृश्य जाळे दूरवर पसरले आहे.
कधी अगदी उलट वाटते - जाळे विणले आहे आपल्या संरक्षकांनी, त्यांना पकडण्यासाठी. पण जाळ्याच्या वेड्यावाकड्या विणीमधून ते निसटत आहेत.

छायाचित्र टीका: मासेमारी

नमस्कार,

परत एकदा कवडी या ठिकाणचे एक छायाचित्र. कवडीला अनेक वेळा मासेमारी करायला लोक येतात. अश्याच एका प्रसन्न सकाळी काढलेले हे चित्र. हे चित्र जसेच्या तसे काढले आहे. चित्रात कोणताही (छोटादेखील) बदल केला गेला नाहीये.

माझा प्रयत्न

नमस्कार,
उपक्रम फारच आवडला. माझेही काही प्रयत्न........

छायाचित्र टीका

शरद सरांची शिकवणी मिळुनही अभ्यास न करता काढलेले एक छायाचित्र डकवत आहे. कसे वाटले ते सांगावे?

प्रकाशचित्र : धृव यांची शिफारस...

प्रकाशचित्रांचे जाणकार उपक्रम सदस्य 'धृव' यांच्या शिफारसीनुसार एक प्रकाशचित्र येथे देत आहे -

स्थळ : महाबळेश्वर ते पोलादपूर घाटरस्ता
वेळ : सूर्योदय
काळ : पावसाळा नुकताच सरतोय - न सरतोय (७ ऑक्टोबर २००८)

माझी माऊ

माझ्या मोबाईलने मी माझ्या माऊचा फोटो काढला आहे. त्या माऊच्या विषयी आपण इथे सविस्तर वाचू शकता.

पक्ष्यांचे मनोहर जग!

आत्ता काही महिन्यांपूर्वी बारामती परिसरात पणदरे गावात माझ्या आत्याकडे गेलो होतो. तिच्या घरातल्या बागेतच काढलेले पक्ष्यांचे काही फोटो टाकत आहे.

प्रकाशचित्र : डुंबणे - एक स्वर्गीय अनुभव

परवाच रायगडावर गेलो होतो. माहितीपर वर्णन आणि प्रकाशचित्रे ओघाने येतीलच.
पण रायगडावर पहायला मिळण्यास दुर्मिळ असे एक वेगळे दृष्य येथे देत आहे.
कसे वाटते? ते सांगावे -

डुंबणे : एक स्वर्गीय अनुभव !!

कॅमेऱ्याची निवड

निवड कॅमेऱ्याची

छायाचित्र टीका - ३२

माझा कॅमेरा - कोडॅक क्रोमा
रोल - कोडॅक गोल्ड
स्थळ - उत्तन, भाईंदर

छायाचित्र टीका - ३१

नमस्कार मंडळी,

आज सकाळी कवडी (पुण्याजवळ) येथे गेलो होतो. सुर्योदयाचे फोतो व काही पक्ष्यांचे फोटो काढले. हा फोटो कसा वाटतो ते सांगा. फोटो आवडला नसला तर का नाही आवडला हेही सांगा.
कळावे,
ध्रुव

छायाचित्र टीका - ३०

छायाचित्रकला-८

ह्या भागात आपण फ़ोटो कॉम्पोझिशन यावर थोडी माहिती घेऊ. जेंव्हा मानवाने गुंफ़ेतल्या भिंतीवर चित्रे काढण्यास सुरवात केली तेंव्हा त्याला एक विशाल फ़लक उपलब्ध होता. बैलाचे चित्र कोठे काढले आणि हत्तीचे कोठे याने फ़रक पडत नव्हता.

दिवाळी अंक २००८ - समुदाय सहभाग - छायाचित्रे

नमस्कार उपक्रमींनो,

छायाचित्र टीका - २९

आधिच्या छायाचित्र परिक्षणाबद्दल सर्वांना धन्यवाद.
आज दुसरा फोटो टाकत आहे.
IMG_1598

सांगा कसा वाटतो ते!
मला वाटलेली त्रुटी:

छायाचित्रकला-५

मीटरिंग

छायाचित्रकला-३

छायाचित्रकला -३

छायाचित्र टीका - २८

नमस्कार मंडळी,

exif

Camera - Nikon D40
Aperture - f5.6
Shutter Speed - 1/160
Focal Length - 300mm
Metering - Spot
© Dhruva Mulay ;)

छायाचित्र टीका २७

Exposure

असेच एकदा एक्स्पोजरशी खेळताना काढलेले हे चित्र! बघा आवडते का!

छायाचित्रकला-२

भाग-२

छायाचित्र टीका २६

मला फोटोग्राफीमधलं काहीही कळत नाही, पण शिकावं असं वाटतं.. हे काही मी काढलेले फोटो.. काय चांगलं, काय वाईट, अजुन काय करता येईल ई. मार्गदर्शन करा मला!

छायाचित्रकला

उपक्रमवरील वरील समुहाला मिळणारा मोठा प्रतिसाद बघून वाटू लागल्रे की या विषयावरची थोडीशी प्राथमिक माहिती सर्वांना करून द्यावी. थोड्य़ा तांत्रीक माहितीने छायाचित्राच्या गुणवत्तेत फ़ार फ़रक पडू शकतो. उदा.

छायाचित्र टीका २४: स्पर्श

एका लहानग्याने हातावर धरलेले फुलपाखरु

कॅमेरा : कॅनन डिजीटल रेबेल ३५०ड
ऍपर्चर ५.६
शटर १/१००
आयएसओ १००

छायाचित्र् टीका २३

हे आजोबा लेण्याद्रीजवळ भेटलेले. फोटो काढु का विचारल्यावर म्हणाले माझे कशाला फोटो काढतुस? फोटोत किंचित खिन्न दिसतात पण फोटो दाखवल्यावर जाम खुश झाले

छायाचित्रकला

छायाचित्रकला
वरील विषयावर एक लेखमालिका लिहावयाचा विचार आहे. अर्थात नवागतांकरिता.पुढील बाजू थोडक्यात सांगावयाचा प्रयत्न करणार आहे.

छायाचित्र टीका २१

पुढील फोटो कॅननचा एस. डी. ८५० आय. एस. हा ८ मेगापिक्सेलवाला डिजिकॅम वापरून काढले आहेत. मला फोटोग्राफीतलं ओ की ठो कळत नसतानाही हे फोटोज काढून पाहिले आहेत. त्यामुळे त्यात अनेक त्रुटी असतील. त्यावेळचे सेटिंग्ज आता आठवत नाही आहेत.

छा टी - पाकोळी

नमस्कार मंडळी,

आज सकाळी पुण्यात ओकायामा गार्डन - अर्थात पु. ल. देशपांडे बागेत गेलो होतो. तिथे पाण्याच्या जवळ या पाकोळीचा फोटो मिळाला. बघा आणि सांगा कसा वाटतो ते.

सूर्यग्रहण

Eclipse

आत्ताच झालेल्या सूर्यग्रहणाचे हे छायाचित्र!

-- भालचंद्र!

अजुन काही छायाचित्रे इथे उपलब्ध आहेत :
http://physics.unipune.ernet.in/~bspujari/Solar%20Eclipse/

छायाचित्र टीका १९

लास वेगस येथिल हॉटेल पॅरीस समोरील आयफेल टॉवरची प्रतिकृती.

कॅमेरा : कॅनन डिजीटल रेबेल ३५०ड
ऍपर्चर : १४
शटर : ३ सेकंद
आयएससो : ४००

छायाचित्र टीका १७

Harishchandra
Harishchandra

हरिश्चंद्र गडावरुन दिसणारे विलोभनिय द्रुश्य!
हा फोटो स्टिच केलेला आहे. ४ वेगवेगळे फोटो एकत्र करुन तयार केलेला हा फोटो आहे.

छायाचित्र टीका १६

नमस्कार,

खालील चित्र मी एका सहलीला काढले आहे.
चित्रः नाग - Spectacled Cobra

छायाचित्र टीका १५

फुलपाखारांची चित्रे!

छायाचित्र टीका १४

दिडेक वर्षापूर्वी 'सेंट लुईस' इथे टिपलेले हे चित्र आहे.
'सेंट लुईस' हे गाव अमेरिकेतील मिझोरी राज्याची राजधानी असून तिथल्या भव्य कमानीसाठी प्रसिद्ध आहे.

छायाचित्र टीका १२: नवशिक्याने काढलेले फोटो

हे फोटो केवळ कॅमेर्‍याचा अंदाज घ्यावा म्हणून काढलेले आहेत. बघा कसे वाटतात.

कर्पुरारती

छायाचित्र टीका ११ - शेंदरी रानफूल

हे एका रानफुलाचे चित्र. टाहो सरोवर, कॅलिफोर्नियाजवळ काढले -

शेंदरी रानफूल आणि गवत
शेंदरी रानफूल आणि गवत

कॅमेरा : ऑलिंपस ई-५५०

छायाचित्र टीका १० - भुलेश्वर

राम राम,

मध्यंतरी भुलेश्वर येथे जाण्याचा योग आला. तिथे काढलेल्या अनेक चित्रांपैकी हे एक.

एक्सिफः
कॅमेरा - निकॉन ड४०
लेन्स् - १८ - ५५

छायाचित्र टीका ९

इथे अनेक चांगले छायाचित्रकार असताना मी माझे छायाचित्र टटीकेसाठी इथे ठेवण्याचे धाडस करत आहे. मला जाणकारांकडुन काहीतरी मार्गदर्शन होइल असा स्वार्थ त्यात आहे :).

छायाचित्र टीका ८

कॅमेरा - कॅनन डिजीटल रेबेल
आयएससो - ४००
लेन्स - ११९ मिमि
शटर - १/१००
ऍपर्चर - १४

छायाचित्र टीका ७

पश्चिम इटलीच्या किनार्‍यावर चिंक्वे तेर्रे नावाची पाच खेडी आहेत. यातल्या एका खेड्यापर्यंत रेल्वेने जाऊन इतर पाच खेडी पायी बघता येतात.

फ़ोटोशॉपचे उपयोग

फोटॊशॉप ----

छायाचित्र टीका ६

नमस्कार मंडळी,

छायाचित्र टिका-५

या चित्रात सुधारणेला बराच वाव तर आहेच पण यात कोणते सुधार आवश्यक आहेत याचबरोबर हे सुधार-संस्करण कसे करावे यावर उहापोह अपेक्षित आहे.

cloud

छायाचित्र टीका ४

या शनिवारी-रविवारी राजमाची किल्ल्यावर जाऊन आलो. जरा आराम करायला टेकलो असता संध्याकाळी समोर हे चित्र दिसले. मग काय लगेच कॅमेर्‍यात कैद केले. याचेही परखड रसग्रहण व्हावे यासाठी आपल्यासमोर ठेवतो आहे.

छायाचित्र टीका ३

ध्रुव ह्यांनी सुरू केलेल्या ह्या छान उपक्रमामध्ये आणखी एक चित्र टाकत आहे.

अमेरिकेतल्या स्मोकी माउंटन भागात केड्स् कोव्ह ह्या भागाला भेट देताना हे पाडस अगदी जवळ दिसुन आलं थोडं थोडं करत अगदी जवळ जाऊन ह्याचे चित्र टिपता आले.

छायाचित्र टीका २

छायाचित्र टीका २:

नमस्कार मंडळी. अजुन एक चित्र.

शिवलिंग

छायाचित्र टीका १

नमस्कार मंडळी,
छायाचित्र टीका व उपक्रम सुरु करुयात.

ढाक बहिरीची चित्रे

शनिवार दि १७ मे ला आम्ही म्हणजे आजानुकर्ण आणि आमचे काही मैतर ढाक बहिरीच्या ट्रेकला गेलो होतो. त्याचे काही फोटो खाली आहेत. अगदी सर्वच नसले तरी काही फोटो फोटोग्राफीचे सर्वमान्य नियम(नियम हा शब्द धोकादायक आहे.

छायाचित्रे आणि इमेज प्रोसेसिंग

परवा आंतरजालावर भटकताना एका अमेरिकन अनुदिनीत उत्कृष्ट छायाचित्रे बघायला मिळाली. नंतर कळाले की छायाचित्रकाराने फोटोशॉप वापरून इमेज प्रोसेसिंग केले आहे. हे कळाल्यावर मला थोडे फसवणूक झाल्यासारखे वाटले.

Syndicate content