ह्या नौटंकीच्या औलादीला...
"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...
ह्या नौटंकीच्या औलादीला
प.पू. वगैरे म्हणून डॉ. आठवले महाशयांनी त्यांच्यावर फारच अन्याय केला. आठवले गप्प बसले असते तर बरे झाले असते.
***
१९७३-७४ सालाच्या आसपास धाराशीव (उस्मानाबाद) या ठिकाणी पन्नाशी ओलांडणारा एक छपरी मिशावाला धोतर, टोपी आणि काखेला झोळी असा आवतारात आमच्या घरी आला होता. त्याच्याशी माझे वडील काही काळ बोलले होते. चार पाच वर्षे गेल्यावर त्या व्यक्तीचे नाव संभाजीराव भिडे असे होते असे मला समजले. ते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशीव जिल्हाप्रमुख होते हेही नंतरच समजले.
संघाशी आमच्या घराचा तो पहिलाच थेट संबंध! संघाचे एक तरूण (पूर्णवेळ प्रचारक) श्री. ग. म. महाजन तेंव्हा धाराशीवला रहायला आले होते. त्यांच्या जेवणाची सोय लावण्याच्या खटपटीत संभाजीराव होते. ती त्यांची आमच्या घराला पहिली आणि शेवटची भेट.
त्यानंतर संभाजीराव सांगलीला रहायला गेले.
***
'संभाजीराव भिडे' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी ! खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे (?) विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी...
पुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे!
दुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांच्या जागी तितकाच खंदा कार्यकर्ता संघाला हवा होता."संघटनमें शक्ती है!" ही संघाची घोषणा. तिथे व्यक्तीला किंमत नाही. संभाजीरावांना ठाण्याला कूच करण्याचा आदेश झाला. सांगली जिल्ह्यातलं काम अर्धवट टाकून जायला संभाजीराव तयार होईनात. 'आदेशाचं उल्लंघन' हा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. तेंव्हा पूर्ण आयुष्य ज्या संघाला वाहिलं त्यालाच रामराम ठोकण्याची पाळी संभाजीरावांवर आली. 'संभाजीरावांनी संघ सोडला' ही बातमी फारच धक्कादायक होती. कित्येक संघकार्यकर्ते हळहळले.
***
संभाजीरावांना असलेला संघाचा आधार गेला की संघाचा आधारस्तंभ ढासळला? कोणास ठाऊक? पण प्रचंड हिंमत आणि धडाडी असलेल्या संभाजीरावांनी सांगली जिल्ह्यात स्वतःच 'श्री शिवप्रतिष्ठान' नावाची संघटना काढली.
रा.स्व. संघाबद्दल बहुजन हिंदू समाजात 'ही बामणांची संघटना' असा सर्वसाधारण समज! त्यामुळे वैचारीक बैठक असूनही तीन टक्के समाजाची संघटना जनजागृती करायला पुरेशी नाही हे संभाजीरावांनी ओळखलं होतं. बहुजन समाजात जागृती घडवायची असेल तर त्यांना आपली वाटेल अशी संघटना पाहिजे.
त्यातूनच गडांच्या वार्षिक मोहिमा काढण्याची कल्पना त्यांना सुचली. शिवाय संघाच्या धर्तीवर दसर्याला 'दुर्गामाता दौड'!
साडेपाच फूट उंची, उन्हातान्हात रापलेल्या तांबूस काळसर वर्णं, पांढर्याधोप मिशा, धोतर आणि पांढरा सदरा अशा वर्णनाचा - सांगली राजवाडा भागात एका खोलीत पुस्तकांच्या ढिगार्यात रहाणारा - स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून जेवण करणारा पासष्ट -सत्तर वर्षांचा एक अविवाहीत म्हातारा - तोच बनला शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा!
***
बघता बघता जतपासून शिराळ्यापर्यंत आणि विट्यापासून मिरजेपर्यंत गावागावातले तरूण शिवप्रतिष्ठानाचे कार्यकर्ते बनले. दरवर्षी च्या मोहिमेत गडकोट पायाखाली घालणार्यांची संख्या हजारांत पोचली. "पोरगं गुरुजींच्या संगतीनं रांगेला लागतंय. व्यसनं करत न्हाई. आई-बाला मानतंय.", गावागावात गुरुजींचा आदर दुणावत चालला. विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या तालमी याच शिवप्रतिष्ठानच्या 'शाखा' झाल्या. संघटनेची ताकद इतकी वाढली की काँग्रेस, जनता पक्ष, भाजप - या पक्षांचे पुढारी संभाजीरावांची मनधरणी करू लागले. आजवर प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुर्गामाता दौडीत भाग घेतला आहे.
संभाजीरावांनी कुणाला जवळ केलं नाही. पण दूरही लोटलं नाही.
हळूहळू प्रतिष्ठान लगतच्या जिल्ह्यांतही मूळ धरू लागलं.
***
१९९२ साल असावं. कॉलेज संपलेलं. लहानपणी घडलेले संघाचे विचारही धुवून गेलेले. पण गिर्यारोहण करण्याची हौस होती! शिवप्रतिष्ठानच्या एका मोहिमेवर मीही गेलो होतो. मांढरदेवीपर्यंत एस्टीनं जाऊन तिथून चंदन-वंदन, पांडवगड, लिंगाणा आणि रायगडावर सांगता अशी ती मोहीम. तीन दिवसांची.
तीन हजार तरूण लोकांचा एक प्रचंड प्रवाह रांगा धरून गडांवर चढाई करत होता. आणि सर्वात मागून आमच्यासारख्या टंगळमंगळ करणार्यांना हाकलत चाललेला तो विक्षिप्त म्हातारा. ते अविस्मरणीय दृष्य कोणीही आयुष्यात विसरणार नाही.
......................................
रायगड! संध्याकाळची वेळ. सूर्य अस्ताचलाशी लगट करत होता. कवठे महांकाळहून आलेल्या धनगर कार्यकर्त्यांनी गंभीर घुमणार्या ढोलांनी वातावरण भारून टाकलं. जनता पार्टीचे सांगलीचे खासदार(?) संभाजी पवार (जात्याच पैलवान) काहीतरी बोलले. पोरांना चांगलं वळण लावल्याबद्दल भिडे गुर्जींचे आभार मानले.
आणि मग संभाजीराव भिडे - तीन हजारांचा तो समुदाय श्वास रोखून त्यांचं भाषण ऐकत होता. शेवटच्या रांगेपर्यंत (माईकशिवाय) शब्द-न-शब्द स्पष्ट ऐकू येईल असा खणखणीत आवाज! रोमरोम थरथरवणारं वक्तृत्व...
त्याचवेळी त्यांनी प्रतिज्ञा केली - शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा!
आजतागायत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज स्वखर्चाने रायगडावर छत्रपतींची पूजा करत आहेत. आपला नंबर कधी लागतो याची आतुरतेने वाट बघत आहेत.
***
गुरुजींना वंदन करण्यासाठी घाई उडाली होती. मीही त्यात घुसलो. या माणसाला उस्मानाबादनंतर मी प्रत्यक्षात नंतर कधीच भेटलो नव्हतो. जवळजवळ वीस वर्षे झाली होती. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि हळूच म्हणालो, "गुरुजी, अमुक -अमुक यांचा मुलगा. तुम्ही..."
माझं वाक्य संपण्याच्या आतच "असं का? कसे आहेत तुमचे वडील? धाराशीवला असताना भेट झाली होती. आता कुठे असतात? रिटायर झाले नसतील अजून..., खूप चांगलं वाटलं - तू आलास" असं म्हणत माझ्या वडिलांबद्दल मलाच सांगायला सुरुवात केली. खरे म्हणजे या माणसाला आयुष्यभरात माझ्या वडिलांसारखी लाखो माणसे भेटली असतील. पण भेटलेल्या प्रत्येक माणसाचं संपूर्ण नाव आणि संदर्भ त्यांच्या लक्षात होता. मी थक्क झालो.
***
संभाजीराव आणि शिवप्रतिष्ठानबद्दल ऐकत होतो. पुन्हा कधी 'मोहिमेवर' गेलो नाही. मग मधे नोकरीमुळे माझं गावच बदललं.
आणि आता जवळजवळ पंधरा वर्षांनी - ही नौटंकीची औलाद...
ह्या बातमीतसंभाजीरावांनी जे सांगितलं तसंच झालं असणार. तो ऋषितुल्य माणूस खोटं कशाला बोलेल? एखाद्याचा खून जरी केला तरी - 'मी खून केला आहे' असं सांगणार्यांपैकी माणूस तो. जुन्या पिढीतला. आज एकेक कार्यकर्ता पक्षांना किती किमतीला पडतो ते उघड आहे. हा फाटका, निर्धन माणूस केवळ स्वबळावर असे हजारो कार्यकर्ते उभे करतो , त्यांची बाई-बाटली बंद करतो, गुटखा-सिग्रेट बंद करतो, त्यांच्यात शिस्त बाणवतो, त्यांना ध्येयवादी बनवतो.ज्याच्या एका शब्दाखातर गुंड म्हणवले जाणारे तरूण राष्ट्रभक्त, शिवभक्त झाले त्याचं चारित्र्य कसं असेल ते वेगळं सांगायला नको. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर?
***
हिंदुत्ववाद चूक की बरोबर हा वादाचा विषय! पण केवळ एक विचारप्रवाह म्हणून पाहिलं तर तोही अनेकांतलाच एक.
संभाजीरावांसारख्या माणसाला तो पटला म्हणून ते हिंदुत्ववादी झाले. कम्युनिझम पटला असता तर कट्टर कम्युनिष्ट झाले असते.
सावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांचं महात्म्य कमी होत नाही. भगतसिंग, चंद्रशेखर आजाद कम्युनिष्ट होते म्हणून देशद्रोही ठरत नाहीत. मोठी माणसं ती! आपण त्यांच्या विचारांबद्दल मतप्रदर्शन करणं म्हणजे उंटाच्या (गां) बुडख्याचा मुका.
संभाजीराव भिडे गुरुजी हा काय प्रकार आहे ते त्यांना ओळखणार्यांना माहित आहे. पैसे देऊन, चिथावणी देऊन दंगल घडवून आणणार्यातला तो माणूस नव्हेच.
***
आणि सरतेशेवटी अठ्याहत्तर वर्षाच्या एका किरकोळ म्हातार्याला रस्त्यावर पाडून चड्डीत शी- शू करेपर्यंत काठ्यांनी मारण्यात काय मर्दूमकी?
'साली, नौटंकीकी औलाद!' म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा


निखळलेला दुवा
बातमी - इथे पहा
http://www.pudhari.com/SangliStanikDetailNews1.aspx?news_id=33653 इथे पहा.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत
भापो.
विसुनाना,
आपल्या भावना पोहोचल्या. दुवा अजूनही मला दिसलेला नाही.
सतत आसपास 'नौटंकी' पहात असल्याने खरे काही असू शकते यावर पटकन विश्वास बसत नाही.
खरे म्हणजे या माणसाला आयुष्यभरात माझ्या वडिलांसारखी लाखो माणसे भेटली असतील. पण भेटलेल्या प्रत्येक माणसाचं संपूर्ण नाव आणि संदर्भ त्यांच्या लक्षात होता. मी थक्क झालो.
अनेक संघ प्रचारकांनी मला सुद्धा असे अनेकदा थक्क केले आहे.
--लिखाळ.
+१
प्रतिसादाशी सहमत.
+१
दुवा वाचायला आवडेल. किमान कुठल्या तारखेचा वृत्तांत आहे ते कळवा...
भापो.
विसुनाना,
आपल्या भावना पोहोचल्या.
नौटंकी
हेच मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. दै सकाळ बातमीत मी ते वाचले होते.
मान्य आहे. माझ तेच खरं . माझच बरोबर इतर चुक अशी भुमिका असु नये. माझे तेच देश प्रेम् इतरांचा तो देश द्रोह असेही असु नये. तरी पण प्रमाणीकरण आवश्यक आहे.
प्रकाश घाटपांडे
सुंदर लेख
विसुनाना,
भिडे गुरुजींचा पुनर्परिचय झाला. लहानपणापासून माझा संघाच्या अनेक प्रचारकांचा परिचय असल्याने, भिडे गुरुजींची भेट आधी झाली होती (७५ च्या सुमारास). त्यांना मारहाण झाल्याचे वृत्त वाचून सुन्न झालो होतो.
तुमचा लेख वाचून छान वाटले.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
वा वा!
वा वा विसुनाना,
आपले असे लेखन वाचून बरे वाटले.
भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता. असो. अजूनही वेळ गेलेली नाही.
लहानपणी घडलेले संघाचे विचारही धुवून गेलेले.
असे आज कीतीतरी जण आहेत. यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे जुने संघाचे दिवस आठवतायेत पण (सहज)मार्गही दिसत नाही.
या लोकांनाही 'संघाचे लोक' (पण कार्यकर्ते नव्हेत) म्हणून एकत्रीत करणे शक्य आहे.
बाकी संघासाठी/सेवादलासाठी काम करणारी एक खास पीढीच होती हो. वेगळेच लोक ते. या देह्स्सतले नव्हतेच असे वाटणारे खरे खुरे प्रामाणिक. ते लोकही गेले नि ती निस्पृह पणे काम करण्याची इच्छाही...
जे काही उरले आहेत त्यांना पोलिस असे मारत सुटले आहेत...
आपला
गुंडोपंत
खरे आहे..
भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता.
खरे आहे. बर्याचदा लेखाच्या भाषेवर केवळ प्रतिसादच नाही तर त्या लेखाचे (आणि लेखकाचे) विश्लेषण होत असते.
असे सांगावेसे वाटले.
ते लोकही गेले नि ती निस्पृह पणे काम करण्याची इच्छाही...
हे खरे नाही. सुदैवाने मी आजही अनेक व्यक्ती बघितल्या आहेत/बघतोय की ज्या विविध सामाजीक क्षेत्रात कामे करत आहेत.
असहमत
भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता.
असहमत.
लेखकाला गुरुजीबद्दल जे जाणवले ते त्यांनी लिहिले,ज्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, त्या बद्दल माणूस भरभरुन बोलतो इतके आम्हाला कळते. ही ओळख आधीच करुन दिली असती तरी फारसा फरक आमच्यात तरी झाला नसता, असे आमचे मत आहे.
अनेक संघ प्रचारक,असे अनेकांना, अनेकदा थक्कच करतात, हा अनुभव आमच्याजवळही आहे.
खुलासा
भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता.
गुंडोपंतांच्या वरील वाक्याशी मी सहमत आहे याचा अर्थ तांब्यांच्या लेखाशी आहे असा नाही अथवा कायदा हातात घेण्याशी सहमत आहे असेपण नाही. पण एखाद्या व्यक्तिचा असा परीचय दिल्या नंतर त्या व्यक्तिने काय केले असेल याचा अंदाज येतो. टग्यांनी दिलेल्या दुव्यावरील दै. पुढारीतील माहीती प्रमाणे ते स्वतःला अटक करून घेण्यास तयार होते तरी देखील "ये संभाजी भिडे, नौटंकी की औलाद, साले को मार दो" म्हणत त्यांना कृष्ण प्रकाशांनी मारले. यात त्यांचा (भिड्यांचा) दोष दिसत नाही. मला कुठल्याही चित्रपटाला/पुस्तकाला/कलेला विरोध करणे त्यावर विचार पटत नाहीत म्हणून बंदी घालणे मान्य नाही. फक्त मग त्यात जसे आंबेडकरांचे रीडल्स चालू शकते तसेच अरूण शौरींचे आंबेडकरांचे पुस्तक देखील चालले पाहीजे आणि जेम्स लेनचे शिवाजीवरील (जरी ते पुस्तक पटत नसले तरी). बुद्धीला उत्तर बुद्धीने द्या/कलेला कलेने असे मला वाटते आणि त्यात सर्वांना सारखेच तोलणे महत्वाचे वाटते. आणि त्याबाबतीत मला भिड्यांचा मूळ विरोध पटत देखील नाही. तसाच विरोध मला मेधा पाटकरांचा पण पटत नाही आणि तसेच इतरपण असतील...
सहमत / श्रद्धा, भारावून जाणे वगैरे...
सहमत. भिडेगुरुजींशी प्रत्यक्ष भेट (कदाचित सुदैवाने) घडलेली नसल्यामुळे त्यांच्यावर भारावून जाण्याच्या / भाळण्याच्या प्रसंगातून वाचल्यामुळे, काहीही फरक पडला नसता. किंवा कदाचित आहे तेच मत अधिक प्रबळ झाले असते.
(तसाही या भारावून जाणे वगैरे प्रकारावर फारसा विश्वास नाही. कारण भारावून जाणे म्हणजे आपली अक्कल गहाण टाकणे. मग ज्याच्यावर 'श्रद्धा' ठेवायची त्याने काय वाट्टेल ते सांगितले तरी ते करायचे. 'मशीद [किंवा मंदिर, चर्च, भांडारकर इन्स्टिट्यूट, जे काही असेल ते] तोड' म्हणून सांगितले, की मागचापुढचा, एकंदर परिणामांचा, 'बिग पिक्चर'चा, आपण काय करतो आहोत याचा, कसलाही विचार न करता तोडून मोकळे व्हायचे.
एका ठराविक वयात हे [म्हणजे कोणावर तरी भारावून जाऊन अशी नितांत, पराकोटीची श्रद्धा ठेवणे वगैरे] सर्वांनाच कमीजास्त प्रमाणात होत असावे. विशीत अक्कल नसते. मात्र नंतर बहुधा हळूहळू येत असावी असे गृहीतक आहे*.
*टग्याचा पॅराडॉक्स: विशीत माणसाला मुळीच अक्कल नसते, परंतु आपल्याला जगातले सर्व काही समजते असे वाटत असते. माणूस चाळिशी ओलांडतो, साधारणतः त्यावेळी त्याला [कदाचित अनुभवामुळे] हळूहळू किंचित अक्कल येऊ लागून, आपल्याला बहुधा सगळेच काही कळत नसावे अशी एक पुसटशी शंका येऊ लागते. आणि ज्यादिवशी या जगातले आपल्याला काहीच कळत नाही याची त्याला खात्री पटते, त्या दिवशी 'त्याला ब्रह्मज्ञान झाले!' म्हणून खुशाल त्याच्या चरणांचे तीर्थ घ्यावे!
आणि मग अशा 'श्रद्धास्थाना'ने काय वाट्टेल ते दावे केले तरी त्यावर विशास ठेवायचा. पोलिसी अत्याचार हे दुर्दैवाने कदाचित बर्याच किंवा किमान काही अंशी तरी भारतातील एक दुर्दैवी सत्य असल्यामुळे अशा दाव्यांवर चटकन विश्वास ठेवणे सोपे असते. अशा वेळी जरी एखाद्याने उलटी बोंब मारली तरी खपून जाऊ शकते. आणि भावूक श्रद्धाळू, 'एवढा थोर/भला/ऋषितुल्य माणूस खोटे कशाला बोलेल?' असा विचार हमखास करतात.
एक उदाहरण देतो. एकदा अमेरिकेतील एका शहराहून दुसर्या शहरी विमानाने जात होतो. शेजारी एक जराशी वयस्क बाई बसली होती, तिने तू कोण, कुठला वगैरे चौकशी सुरू केली. मग मी भारतातला हे कळल्यावर, 'हो का? मी नुकतीच भारतात जाऊन आले. आशियाई देशांमधील लोकांना ख्रिस्ताची ओळख करून देण्याचे कार्य आमची संस्था करते. किंबहुना आमचा संस्थापक तुमच्याच देशातला आहे. हे त्याने लिहिलेले पुस्तक.' वगैरे घडले. आता अशी पुस्तके जर मला कोणी [अर्थात फुकटात!] देऊ केली तर सहसा त्यांचे निव्वळ करमणू़कमूल्य लक्षात घेऊन मी ती निमूटपणे स्वीकारतो. त्याप्रमाणे स्वीकारले. नंतर घरी गेल्यावर सहज चाळून पाहिले, तर त्यात [धर्माच्या नावाखाली अमेरिकेत येऊन गोर्या अमेरिकन मुलीशी लग्न करून स्थायिक झालेल्या केरळीय ख्रिश्चन] लेखकाने नेहमीप्रमाणे आशियाई देशांत कसा स्पिरिच्युअल अंधःकार आहे, तो आपण कसा दूर केला पाहिजे, पण या सर्व देशांतील हरामखोर लोककल्याणविरोधी सरकारे कसे वेगवेगळे कायदे करून या सत्कार्याच्या आड येतात, वगैरे [देशवार धार्मिक स्वातंत्र्याच्या अभावाच्या उदाहरणांच्या यादीसह] प्रतिपादन केलेले होते. त्यात पुढे 'मी पूर्वी भारतात राहात असताना ख्रिस्ताची भक्ती केल्याबद्दल माझा कसा छळ झाला, मला लोकांनी कशी मारहाण केली' हेही ठेवून दिले होते. आता माझ्यासारखा एखादा माणूस [किंवा बहुसंख्य उपक्रमी] हे धादांत खोटे आहे हे चटकन समजू शकतो, पण एखाद्या भारताविषयी अनभिज्ञ असलेल्या अमेरिकन माणसास [विशेषतः अशा संस्थेत काम करणार्या व संस्थापकाच्या 'व्यक्तिमत्त्वा'ने / ग्लिबटॉकने भारावून गेलेल्या अमेरिकन माणसास] हे खरे वाटण्याची आणि 'एवढा 'मोठा माणूस' खोटे कशाला बोलेल?' असेही वाटण्याची शक्यता खूपच मोठी आहे.
अर्थात भिडेगुरुजींवरच काय, कोणावरही - झाले असल्यास! - पोलिसी अत्याचार ही एक अत्यंत निषेधार्ह बाब आहे, परंतु या बाबतीत नेमके काय घडले, हे -घटना घडतेवेळी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नसल्यामुळे - नक्की समजणे कठीण आहे.
असो.)
सहमत ( न भारावता)
सहमत आहे.
धुर्त कोटी ब्र्हह्मांड नायक टग्या महाराज कि जय!!!!
प्रकाश घाटपांडे
प्रेरणा ?
'टग्याचा पॅराडॉक्स' मागे खालील ची प्रेरणा भासली.
विशीत तुम्ही समाजवादाने भारावला नाहीत तर तुम्हाला हृदय नाही आणि चाळीशीतही तुमचे विचार बदलले नाहीत तर तुम्हाला डोके नाही. - चर्चिल (?)
तुम्हाला बर्याच गोष्टींबद्दल काहीतरी माहित असते, पुढे काही थोडक्या गोष्टींबद्दल आणखी काही माहिती होते, शेवटी तुम्हाला कशातलेही काहीही कळत नाही हे लक्षात येते - आईनस्टाईन् (?)
प्याराडॉक्स
प्याराडॉक्स आवडला. यावरून रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले एक वाक्य आठवले.
"जेव्हा तुम्ही विशीत असता, तेव्हा लोक काय म्हणतील याची तुम्हाला सतत भीती असते. चाळीशीत लोक काय म्हणतील याबद्दल तुम्ही काळजी करणे सोडून दिलेले असते. साठीत गेल्यावर तुम्हाला कळते की लोक तुमच्याबद्दल विचारच करत नव्हते."
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
प्याराडॉक्स - तसेच अजून
खालील वाक्ये आठवली - माझी नाहीत पण कोणाची ते माहीत नाही
जेंव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्व समजले, युनिव्हर्सिटी तुम्हाला बॅचलर्सची पदवी देते
जेंव्हा तुम्हाला कळते की आपल्याला काहीच माहीत नाही तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला मास्टर्सची पदवी देते
जेंव्हा तुम्हाला समजते (ट्यूब पेटते) की कुणालाचा काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते आणि म्हणते गप बसा - तेरी भी चूप और मेरी भी चूप! :-)
अजून एक
जेंव्हा तुम्हाला समजते (ट्यूब पेटते) की कुणालाचा काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते
यावरून एक लिनक्स फॉर्च्यून आठवले. "OK. So you are a Ph.D. Just don't touch anything." :-)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सहमत आहे
मुद्दे पटले.
धन्यवाद
विसुनाना,
चांगला परिचय करून दिला आहे. "संभाजी भिडे" या असामीविषयी अगदी असेच फार पूर्वीपासून ऐकून आहे. त्यांचा कडवटपणा मान्य असणे वा नसणे हा वादाचा विषय असू शकतो. मात्र बाजारूपणा आणि सवंगपणा त्यांच्याकडून झाला असेल यावर विश्वास बसणे अवघड आहे.
एकलव्य
दुवा...
...मला वाटते हा असावा...
नौटंकी ती नौटंकीच
वयोवृद्ध माणसाला मारहाण न होता हा प्रकार टाळता आला असता. तो का टाळला गेला नाही ते बघीतले पाहीजे. पण तो मुद्दा गौण आहे. एकंदर मुळ प्रश्र सोडवण्यापेक्षा राजकारणात जास्त स्वारस्य असते बर्याच(जवळजवळ सर्वच) लोकांना. प्रत्येक घटनेतुन आपला फायदा कसा करुन घेता येइल हे बघणे. आणि त्याचे इतर काहीही परिणाम झाले तरी कोणाला त्याची तमा नाही. अगदी श्री. भिडे यांना देखील.
सांगलीला त्यादिवशीपुरते बोलायचे झाले तर दंगल व्हायची काही गरज नव्हती. वकीली कुठल्याही बाजुने करता येइल पण मुळ मुद्दा की दंगल न घडवू देणे ह्यात ज्यांची ज्यांची जबाबदारी होती त्या सगळ्यांनी आपली जबाबदारी टाळली.
एखाद्या कलाकृती बद्दल दंगा होणे ही काही नवी बाब राहीली नाही आणि हीच मोठी शरमेची बाब आहे. पहिल्यांदा जेव्हा असा प्रसंग आला असेल् तेव्हाच ह्यासंबधी काही धोरणे आखली असतील (असतीलही)तर त्याचा आधार घेउन अश्या कलाकृती येऊ देणे / न देणे व जर का त्या आल्या तर तो निर्णय मान्य करणे. असे का होत नाही? हम करे सो कायदा. मग आम्ही सगळे बंद करु, जाळपोळ करु. बर तेवढ्याने थांबत नाही. झाल्या प्रकारात विरोध करणारे म्हणजे "विशिष्ट औलादीचे" "अमक्याच" धर्माचे, आमच्या धर्माचे दुष्मन.. हे काय चाललेय, श्री. भिडे यांना समजत नाही?
झाला प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी होता किंवा तसे नसेल तर माझे तेच खरे ह्या अतिरेकी हट्टासाठी होता असे माझे मत आहे. आवडत नाही, पटत नाही तर चित्रपट नका बघू. इथे मुळ प्रश्र/प्रॉब्लेम काय तर झालेली "दंगल". त्याचे परिणाम वाईट आहेत.
मुळ प्रश्र्न अकबर व इतिहास मुळीच नाही. झाला गेला तो अकबर किती वर्षे झाली पण असे इतिहासाचे ओझे घेउन बसलो तर मग सुड फक्त सुड!! त्याला काहीच अंत नाही.
झाला प्रकार हा बेजबाबदार आहेच व ह्याच वाटेने सांस्कृतीक दहशतवाद येतो. आज आम्ही म्हणतो तसाच इतिहास दाखवा. आम्ही म्हणतो तसेच वागा. आमच्या सत्तेखालीच रहा असाच ह्याचा प्रवास असतो. इतक्या टोकाला जाउन आंदोलन करणे ही केवळ स्वताची ताकद दाखवणे आहे. लोकशाही लोकशाही असे मिरवायचे व फक्त झुंडशाही करायची. स्वताच्या मागण्यांसाठी आम जनतेला, कायदा सुव्यवस्थेला वेठीस धरायचे?
स्वताच्या हाताने जेवण करणे, अविवाहीत , पुस्तकाच्या गराड्यात राहणे, ३००० लोकांपुढे माईक शिवाय बोलणे, शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा ही "कार्ये" स्वताच्या मर्जीने केली ना ?कोणी जबरदस्ती तर नव्हती ना केली की त्यांनी असे केले म्हणुन जगात सर्व आलबेल आहे असे म्हणायचे आहे? पण पुर्ण सांगलीला त्या दिवशी त्या टोळीने सांगलीकरांच्या मर्जीशिवाय वेठीस का धरले?
थोडक्यात झाली ती टाळता येण्यासारखी गोष्ट होती व श्री. भिडे यांचा देखील काही प्रमाणात यात दोष आहेच.
का कोण जाणे, श्री. भिडे म्हणजे कोणीतरी महान भारतातील प्रचंड श्रेष्ठ व्यक्ती व त्यांनी केले ते कार्य ते योग्यच असा मुळ लेख व काही प्रतिसाद यातुन सुर उमटल्यासारखे मला वाटले.(तसे नसेलही पण असल्यास प्रतिवाद म्हणून) तसेच ह्या लेखाचा आधार / यापासुन स्फुर्ती घेउन अजुन यापुर्वी आले तसे चिथावणीखोर लेख येतील. म्हणुन ह्या समाजविघातक प्रवृत्तीचा पुन्हा निषेध करायला हे लिहले.
चुक ती चुकच. जे घडले ते निषेधार्हच!!
अवांतर- माझा यात कोणाबद्दल (भिडेगुरुजी किंवा विसुनाना) मुद्दाम वैयक्तिक किंवा चरित्रहनन करायचा हेतु नाही. मुद्दा व जबाबदारी अधोरेखीत करायला काही ठीकाणी परखड लिहले आहे. आशा आहे की समजुन घ्याल.
प्रश्न
लेख वाचून एक प्रश्न पडला. भिडे गुरूजींना या आंदोलनातील फोलपणा कळला नाही का? एका चित्रपटासाठी कायदा हातात घेणे, शहर वेठीस धरणे या गोष्टी कितपत योग्य आहेत? दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाचे कार्य थोर आहे म्हणून त्यांची विचारसरणी विनाशर्त स्वीकारावी हे पटत नाही. माझ्या एक मावशी म्हणत असत, "कुठल्याही माणसाला, कधीही देव्हार्यात बसवू नकोस. काही झालं तरी आपण सर्व माणसेच आहोत हे लक्षात ठेव." आणि याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. इथे कुणाबद्दलही अनादर व्यक्त करण्याचा हेतू नाही हे लक्षात घ्यावे. विरोध विनाशर्त विचारसरणीला मानण्यात आहे. प्रश्न न विचारता एखाद्या विचारसरणीचा स्वीकार केला तर त्याची परिणती मिळेल त्या गोष्टीचे कोलीत घेवून, एकाच अजेंड्यावर लेखमालिका लिहीण्यामध्ये होते हे आपण सर्व बघतो आहोतच.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
निष्ठा
"कुठल्याही माणसाला, कधीही देव्हार्यात बसवू नकोस. काही झालं तरी आपण सर्व माणसेच आहोत हे लक्षात ठेव."
संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांनी संघटना स्थापन करताना हा धोका ओळखला होता. म्हणूनच त्यांनी कोणत्याही व्यक्तिला नव्हे तर भगव्या ध्वजाला गुरू मानले. निष्ठा ही फक्त विचारांशी असावी, व्यक्ती अथवा विशिष्ट परिसर वा संस्थेशी नसावी. अक्षरशः रक्ताचे पाणी करून अनेक संघटना उभ्या केलेल्या प्रचारकांनीही संघाने जेंव्हा सांगितले तेंव्हा अन्य जबाबदारी कोणतीही कुरबूर न करता स्वीकारली.
-जयेश
प्रतिसाद
मोठी माणसं ती! आपण त्यांच्या विचारांबद्दल मतप्रदर्शन करणं म्हणजे उंटाच्या (गां) बुडख्याचा मुका.
माझा आधीचा प्रतिसाद या वाक्याला उद्देशून होता. इथे संघपरिवाराच्या कार्याबद्दल काहीच म्हणायचे नाहीये. मुद्दा हा आहे की कुणाही थोर माणसाचे विचार फक्त त्याच्या थोरपणामुळे स्वीकारू नयेत. आपल्या बुद्धीच्या/विवेकाच्या कसोटीवर घासून पटले तरच स्वीकारावेत. म्हणजे नंतर या विचारांवर कृती करताना वैचारिक गोंधळ होत नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
शिवमूर्तीची पूजा
रायगडावरील शिवमूर्तीची रोज पूजा करण्याचा उपक्रम चालवणारे म्हणून संभाजी भिडे यांची माहिती आहे. याशिवाय त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून बर्याच ठिकाणी प्रभातफेर्याही निघतात असे वाटते.
शक्तीप्रदर्शन वि. सनदशीर मार्ग
वरील लेख आणि सर्व प्रतिसाद वाचले. वाचून जी प्रतिक्रिया आहे ती काही पूर्वानुभवावरून प्रामाणिकपणे देत आहे. व्यक्तिगत रोख किंवा आकस इ. आहे असे मला वाटत नाही, लेखकांना माझे स्नेहीच समजते परंतु काही समज गैरसमज होत असल्यास लेखकाने आक्षेप घ्यावा.
१. अश्रद्ध माणसालाही श्रद्धा असते हे लेख वाचून कळले. (हे लेखकाने आपण अश्रद्ध असल्याचे जाहिर लिहिल्याचे आठवते आणि त्याला या जगात कोणीही अश्रद्ध नाही असा उपप्रतिसाद मी दिल्याचे आठवते. परंतु घटनेला बराच काळ गेल्याने माझ्या आठवणीत गडबड असण्याची शक्यता आहे. लेखकाने तसे लिहिले नसेल आणि इतर कोणी तसे लिहिले असल्यास क्षमस्व तसेच हा मुद्दा ग्राह्यही धरू नये.)
२. लहानपणी आपले थोडेफार गोड बोलणारे सर्वच काका-मामा आपल्याला चांगले वाटत असतात. जर सतत संपर्कात राहीले तर घरातील राजकारण, भाऊबंदकी इ. कळते अन्यथा, मोठेपणीही ते चांगलेच वाटत राहतात. दूरून डोंगर साजरे.
३. लेखन भावनापूर्ण वाटले आणि भावना पोहोचल्या पण मानवी भावना दरवेळेस योग्यच असतात असे नाही.
४. चारित्र्यवान किंवा वयाने मोठ्या माणसाने खोटे बोलण्याची परंपरा धर्मराज आणि विश्वामित्रांपासून (माफ करा, पौराणिक पात्रांपुढे मला गती नसावी.) चालत आली आहे. त्यामुळे वेळप्रसंगी माणसे काय बोलून जातात ते सांगता येत नाही.
५. प्रत्येकजण आपल्या समजूतीप्रमाणे सनदशीर मार्गाची व्याख्या करतो. माझ्या मताप्रमाणे एखादा चित्रपट बंद करा सांगण्यासाठी निवेदन किंवा ४-५ जणांचे शिष्टमंडळ पुरेसे आहे. यंत्रणेला वेठीस धरणे, मोर्चे काढणे याला मी शक्तीप्रदर्शन म्हणेन. या शक्तीप्रदर्शनाने, अरेरावी किंवा हुकूमशाही यापेक्षा फार काही साध्य आहे असे वाटत नाही. मी स्वतः जोधा-अकबर पाहिलेला नाही, पहायचा आहे पण पाहून तो पुढील तीन तासांत मी बहुधा विसरेन. तो ऐतिहासीक चित्रपट आहे असे गोवारीकरांनी सांगितल्याचे आठवत नाही.
६. पोलीसांनी कोणालाच लाठीमार करू नये. धरपकड करणे हे योग्य पण पोलीस आपल्याच जीवाच्या भीतीने हा बचावात्मक पावित्रा घेतात का? आपली रग जिरवायला ते कळत नाही. परंतु, एकदा मोर्च्यात भाग घेतल्यावर तो बाई, पुरुष, वृद्ध, मूल आहे हे पाहत पाहत मूठभर पोलीसांनी निर्णय घ्यायचे सयुक्तिक वाटत नाही. मोर्च्यात येणारा मोर्चेकरी असतो. (हे माझ्याआधी फक्त जनरल डायरचे मत होते का काय कोणास ठाऊक.) असो, पोलीसांनी केलेल्या कृतीचे समर्थन अजीबात करायचे नाही. झाला प्रकार दोन्हीबाजूंनी सारखाच निषेधार्ह आहे.
७. तरूणांना विडी-काडी, दारू सोडून येथे येण्यास उद्युक्त केले ही गोष्ट चांगलीच. हीच गोष्ट मी मुंबईच्या अनिरुद्धबापूंविषयी ऐकली आहे. पण आता बघा, एखाद्या संघटनेचे कार्य, कार्यालय, पत्रके, निवेदने, बैठकी, वीज-पाणी यांची बिले इ. इ. साठी लागणारा पैसा कुठून येतो? शिवसेनेच्या नादी लागून आपल्या घराची होळी केलेली एक व्यक्ती माझ्या स्वतःच्या कुटुंबात आहे (सदर गृहस्थाला चहाचे व्यसन नाही परंतु अर्ध्यापेक्षा जास्त पगार शाखेला जातो). नेते मंडळी संख्येने कमी असते आणि ती आपली पैशांची किंवा प्रसिद्धीची तुंबडी व्यवस्थित भरत असते परंतु ज्या अनामिक कार्यकर्त्यांच्या जिवावर हे चालते ते सहसा आपल्या कुटुंबाला खाईत लोटूनच हे करत असतात. तेव्हा व्यसन हे वाईटच. दारू सिग्रेटचे किंवा संघटनेचे.
मुद्दे पटले
सहमत आहे. विशेष :
या प्रकाराचा मी आणखी एक धडा घेतला आहे. अतिरेकी इस्लामवादी संघटनांना सौम्य मुसलमान सहन कसे करून घेतात? अमेरिकेत ज्यू लोकांविरुद्ध गरळ ओकणारी कृष्णवर्णीय नेशन ऑफ इस्लाम ही संघटना अशाच प्रकारे युवकांना गुंडगिरीतून, व्यसनातून मुक्त करते. गझा येथील हमस संघटना, लुब्नानमधील हिझ्बुल्लाह् संघटना अनेक सेवाभावी कार्ये करतात. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे त्याच्या (लहान) कार्यकर्त्यांना स्वच्छ आणि अभ्रष्ट असल्याचे वलय प्राप्त होते. (त्यांचे सरसेनापती कितीका भ्रष्ट असेनात.)
आता लहानपणापासून आमच्या कुटुंबातले (सौम्य) लोक ज्याप्रकारे संघातल्या अशा सेवाभावी, स्वच्छ लोकांना पूज्य मानतात, त्याच प्रकारे माझे सौम्य मुसलमान मित्र मानत असावेत, असे मी समजून घेतले आहे. पण त्यामुळे हमसच्या धर्मांध राजकारणाला विरोध व्हावा असे माझे मत बदलत नाही. त्याचप्रमाणे अमेरिकेतील सनदशीर (कुठलेही आतंकवादी कृत्य न केलेल्या, पण धर्मांध) नेशन ऑफ इस्लामविषयी. आणि त्याचप्रमाणे भारतातील मुसलमान आणि हिंदू संघटनांविषयी. यात त्यात्या संस्थांच्या काही व्यसनमुक्तीवादी, बालवत्सल, आणि नावे लक्षात ठेवणार्या कार्यकर्त्यांबद्दल अनादर नाही.
तांबे यांनी लेख दिल्यावर, त्यांचे स्रोत संकेतस्थळ मी तपशीलवार वाचले. आणि येथे वृद्धाच्या मारहाणीचे नुसते निमित्त करून भारतात हिंदूंवरच अत्याचार होत आहेत, असा त्यांचा विचार-कार्यक्रम (अजेंडा) दिसला. "सनदशीर आंदोलनांवरचे पोलीस बडगे उठवा", "पोलीस अतिरेक थांबवा" असा विचार-कार्यक्रम असता, तर पूर्णपणे पाठिंबा दिला असता.
शक्तिप्रदर्शन
वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'ह्याचा फोलपणा भिडेंना जाणवला कसा नाही?' बरोबर आहे, कारण भारतातले शेळपट राष्ट्राभिमानी आवाज करून करून करणार तरी किती? आताच, येथल्यासारख्या एखाद्यादुसर्या चर्चा सोडल्या तर ह्या विषयावर (भिडेंना झालेली मारहाण वगैरे*) सगळे कसे शांत शांत झाले आहे.
"५. प्रत्येकजण आपल्या समजूतीप्रमाणे सनदशीर मार्गाची व्याख्या करतो. माझ्या मताप्रमाणे एखादा चित्रपट बंद करा सांगण्यासाठी निवेदन किंवा ४-५ जणांचे शिष्टमंडळ पुरेसे आहे. यंत्रणेला वेठीस धरणे, मोर्चे काढणे याला मी शक्तीप्रदर्शन म्हणेन. या शक्तीप्रदर्शनाने, अरेरावी किंवा हुकूमशाही यापेक्षा फार काही साध्य आहे असे वाटत नाही."
शक्तिप्रदर्शनाने व अरेरावीने तथाकथित प्रगत समाजालाही नमवता येते, हे तर आजकाल बरेचदा वरचेवर दिसून येते आहे. स्मरणशक्तिला विशेष चालना न देता सहज आठवली ती उदाहरणे पहा:
* सलमान रश्दीच्या पुस्तकाच्या वेळी जगभर झालेली निदर्शने-- त्यानंतर भारतात त्या पुस्तकावर बंदी घातली गेली.
* तस्लिमा नसरीनच्या विरूद्ध् भारतात अलिकडेच जी 'निदर्शने' झाली त्यानंतर भारतातल्या कुठच्याही राज्यात तिला रहाणे मुष्कील झाले आहे.
* डच व्यंगचित्रकाराने काढलेल्या चित्रांमुळे विशेषतः युरोपात आणि अर्थातच भारतात प्रक्षोभ उसळला, त्यामुळे युरोपातील अनेक सरकारांना जवळजवळ लोटांगण घालावे लागले. अत्यंत तत्पर व जागरूक अशी ख्याती असलेल्या भारत सरकारने ह्याबाबत संबंधित राष्ट्राकडे निषेध नोंदवला.
* मुस्लिम स्त्रीयांच्या बाबतीतल्या प्रथांबद्दल आवाज उठवणार्या एका (जन्माने मुस्लिमच) असलेल्या अयान हिरसी अली ह्या स्त्रीला नेदर्लंडमधून परागंदा व्हावे लागले.
* ताज्या बातमीनुसार नेदर्लंडमध्येच एका धर्माचे, त्याला जाणवले ते रूप, एका चित्रपट दिग्दर्शकाने चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा बेत दर्शवताच आताच तेथे इतका प्रक्षोभ उसळला आहे, तसेच तेथील सरकारवर इतका दबाव येत आहे, की आतापासूनच तेथे त्या चित्रपटाची व त्या दिग्दर्शकाची गळचेपी (यदाकदाचित खरोखरीच सुद्धा) होण्याची दाट शक्यता आहे.
* कॅंटरबरीच्याच्या आर्चबिशपने शरियातून काही ब्रिटिश कायद्यात घेता आले तर बघावे, असा सूर लावला आहे.
[*अशा विषयावरच्या चित्रपटावर बंदी आणावी इ. बद्दल मला काही म्हणायचे नाही. फक्त ह्याने काय साध्य होते अशा अर्थाचा सूर आहे, म्हणून वानगीदाखल काही उदाहरणे दिली आहेत].
अरेरावी, हुकूमशाही वगैरे
नक्कीच येते. विशेषतः काही जहाल धर्मवेड्यांपुढे सर्व जग नमते असा अनुभव आहे पण म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे म्हणजेच शहाणपणा का? ते करतात म्हणून आम्ही करतो असे करायचे झाले तर त्यांच्यासोबत आपणही मध्ययुगीन काळात जाऊन बसावे असे निदान मला तरी वाटत नाही.
वरील मुद्दे वाचून माझ्या मनात जे आले ते येथे नमूद करते:
सदर गट/ पंथ/ धर्म हा कूपमंडुक आहे. आपले क्षितिज मोठे करण्याचे सोडून असंस्कृतपणाच्या गर्तेत खोल रूतत चालला आहे. मानवी अधिकाराला त्यांच्यामते काहीही किंमत नाही, अशा धर्माशी माझी बांधिलकी नाही याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानते.
असो, माझ्या धर्माबद्दलही मी हाच विचार करावा काय?
राजकारणी त्यांचे तुष्टीकरण करून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी सदैव तत्पर असतात. या राजकारण्यांचा कोणताही धर्म नाही, त्यांचे कोणीही आई-वडिल नाहीत आणि सगे सोयरे नाही. सत्ता आणि खुर्ची यासाठी ते कोणत्याही थराला जातात.
मूठभर लोकांना हाताशी पकडून, सरकारचे विशेष अतिथी नसताना भारतात खरंच काही साध्य आहे का? हिंदूंना काठ्यांनी मारा आणि मुसलमानांचे लाड करा असा सूर कोणीही लावल्याचे येथे दिसत नाही पण ज्या समाजात एकी नाही. जिथे भय्यांना हाकला, बिहारींना हाकला आणि काही विशिष्ट गोष्टींमध्ये मात्र एकजूट करा असे कोणी म्हणू लागले तर ते शक्य आहे का?
मध्यम मार्ग असू शकतो
हा प्रप्तिसाद जरी मी प्रियालींच्या एका विशीष्ट प्रतिसादाला उत्तर म्हणून देत असलो, तरी त्यानिमीत्ताने मी काही इतर ह्या व ह्यासंदर्भात झालेल्या अगोदरच्या चर्चेत लिहील्या गेलेल्या बाबींच्या संदर्भात येथे लिहीत आहे.
सध्या हिंदूंची स्थिती 'कुणीही यावे, टपली मारून जावे' अशी आहे #. भारतात व जगात. ह्याउलट मुसलमानांची स्थिती आहे-- युरोपातील राज्ये व ब्रिटन त्यांच्यापुढे गुढघे टेकून उभे आहेत, ते मुख्यत्वे ह्या शक्तिप्रदर्शनामुळे. आणि भारतातले अवास्तव तुष्टिकरण मतांच्या राजकारणातून आहे.
"ते करतात म्हणून आम्ही करतो असे करायचे झाले तर त्यांच्यासोबत आपणही मध्ययुगीन काळात जाऊन बसावे असे निदान मला तरी वाटत नाही."
हे दुसरे टोक झाले. पण बहुसंख्य हिंदू 'मला काय त्याचे' असे सहज म्हणून ह्या सगळ्याकडे काणाडोळा करतात, त्यामुळे आपल्यात संघशक्ति अजिबात नाही, हे जगाने ओळखले आहे. तेव्हा अगदी धर्मांधांचे दुसरे टोकच गाठावे असे म्हणणे नाही, पण जरब बसावी, इथपत तरी वचक असावा. अर्थातच आता 'इथपत म्हणजे नक्की कितपत' वगैरे चर्चा होऊ शकते. पण जे आहे ते सारे आलबेल आहे, असे मानणे आत्मघातकी आहे.
भिडेंच्या सदर आंदोलनानिमीत्त झालेल्या ह्या व ह्या अगोदरच्या चर्चेत धर्मांतराचा सहज उल्लेख केला गेला. दोन्ही ठिकाणी तो उपसाहात्मक होता हे खरे, पण 'तुम्ही म्हणता भारतात हिंदूंवर अन्याय होतो आहे, पण मुसलमानांचे तुष्टिकरण होत आहे ना. मग व्हा मुसलमान' ह्या प्रकारच्या उठवळ सल्ला दिला गेला. तेव्हा सदर सल्लागाराला हे माहिती नसेल की भारतातच काय जगातल्या इतर अनेक देशात/ प्रांतात* मुसलमानांची ह्याच मुद्यावर आंदोलने सदैव चालू असतात. तेव्हा तसे धर्मांतर केल्याने गणेश तांबेंचा प्रश्न सुटणार नाही. उलट त्यांना तिथल्या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल! कुणीही कुणालाही (ह्या दुसर्या 'कुणाला' त सर्वच धर्मिय आले, केवळ हिंदूच नव्हेत) धर्मांतर करण्याचा सल्ला इतक्या थिल्लरपणे द्यावा हे व्यथित करणारे आहे.
* ब्रिटन (शरिया लागू करा, तिथे जे काही बॉंबहल्ले झाले, ते त्या समाजघटकांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवल्यामुळे झाले म्हणे).
* फ्रान्स, नेदर्लंड्स, नॉर्वे'
* बोस्निया (कोसोवो फुटून निघालाच)
* चेच्निया
* चीन
* फिलीपाईन्स
* थायलंड (२००४ पासून सुरू झालेल्या 'आंदोलना'त आतापर्यंत सुमारे २५०० मृत्यू झालेले आहेत).
* म्यनमार (करेन फुटिर)
* मध्य पूर्व (पॅलेस्टाईन- इस्राईल, लेबनॉन इ).
* भारत
तथाकथित मध्यम (मॉडरेटला मराठी प्रतिशब्द काय?) मलेशियातील केलांतनमधे शरिया लागू झालेला आहे. तुर्कस्थानातही प्रगत राजवट कितपत चालू राहिल ह्याबद्दल आता शंकाच आहे.
# भारतात जे काही चालले आहे, ते विकासांनी त्यांच्या एका दीर्घ प्रतिसादात विशद केले आहेच. त्यात थोडीफार भर टाकतो:
पोप भारतात- जेथील प्रजा बहुसंख्य हिंदू आहे- दिवाळीच्या सुमारास येतो, व 'येथल्या बहुसंख्य लोकांच्या मनात अंधकार आहे, त्यांच्यासाठी ज्ञानाची ज्योत उजळली पाहिजे' असे पॅट्रनायझिंग (म. प्र.?) उद्गार काढून जातो. ह्याउलट डॅनिश व्यंगचित्रकाराच्या प्रसंगानंतर, आताचा पोप मुस्लिम धर्मगुरूंबरोबर बैठक करतो, व बहुतांशी तुष्टिकरण करतो. चीनने वॅटिकनचा उत्तमपैकी हात पिरगळून ठेवला आहे. शेवटी वॅटिकन हवालदील झाले व आता ते चिनी सरकारशी 'तहाची' बोलणी करणार आहेत.
आपले अं. नि. स. चे कार्य घ्या. त्यात मुसलमानांच्या चुकिच्या रूढींबद्दल, रितीरिवाजांबद्दल काय आहे? माझ्या अल्प माहितीप्रमाणे शून्य. त्यांचे सगळे शौर्य हिंदूंपुरते मर्यादित आहे. हिंदूंचे अनेक रितीरिवाज, त्यांच्या अनेक रुढी चुकिच्या आहेत व त्या दूर केल्या पाहिजेत ह्यात शंकाच नाही. भोंदू साधू, बुवा बापूंपासून समाजाला वाचवले पाहिजे ह्याबाबत काहीच दुमत नाही. पण ह्याइतकीच, किंबहूना ह्यापेक्षाही जास्त भयानक रूढी (लहान मुलींचे सर्कमसायेझशन), समज (कुटुंबनियोजनाचा अभाव) व गंडेदोरे, धुपारे इ. मुस्लिम समाजात आहेत. व त्यांचाही एकंदरीत समाजजीवनावर तसेच देशाच्या रहाणीमानावरही विपरीत परिणाम होत आहे.
इतरस्त्रः
मलेशियातील हिंदूंची शांततामय निदर्शने लाठीहल्ला करून उधळून दिली जातात, इतकेच नव्हे, त्यांच्या पुढार्यांना देशघातकी असल्याच्या आरोपावरून अटक होते.
टॉयलेटसीटवर, पादत्राणांवर हिंदू देवतांची चित्रे काढणे, इ. नेहमीचेच झाले आहे.
ही काही ठळक उदाहरणे झाली.
फोलपणा
मी जेव्हा 'या आंदोलनातील फोलपणा' म्हटले तेव्हा मला हा अर्थ अभिप्रेत नव्हता. माझ्या मते हे आंदोलन चुकीच्या मुद्यांवर बेतलेले आहे, फोलपणाचा अर्थ त्याच्याशी संबंधित होता. असो.
दिलेल्या उदाहरणांखेरीज आणखीही बरीच सापडतील. विशेषतः मुस्लिम राष्ट्रांमध्ये.
*अफगाणिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याने इस्लामविरोधी फाईल संगणकावर उतरवली म्हणून त्याला देहदंडाची शिक्षा फरमावण्यात आली होती. (नंतर काय झाले ठाउक नाही.)
*दोन आठवड्यांपूर्वी यूट्युबवर इस्लामविरोधी चित्रफीत आहे असे कळताच यूट्यूबचे जगभरचे प्रक्षेपण काही वेळासाठी बंद पाडण्यात आले. अधिक शोध घेतल्यानंतर याचा उगम पाकिस्तानमधून झाल्याचे कळाले.
इथे मुद्दा हा की आपणही याच मार्गावर जायचे आहे का? धर्म कुठलाही असो, त्यात कट्टरपणा आला की त्याचा परिणाम विनाशातच होतो. मग आम्हाला फायर पचत नाही, व्हॅलेंटाइन डेचे राजकीय भांडवल करता येते, शिल्पा शेट्टीने काही केले की आमच्या संस्कृतीचा र्हास होतो. यादी न संपणारी आहे.
[कँटरबरीच्या आर्चबिशपच्या वक्तव्यानंतर तिथेही बराच गदारोळ झाला होता.]
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
विकी
अजून एक उदाहरण
विकीवरती मोहंमदाचे चित्र असल्यामुळे गडबड करण्याचा प्रयत्न झाला पण तो तितकासा यशस्वी होऊ शकला नाही असे ऐकले. जरा (चांगल्या अर्थे) आश्चर्य वाटले की असा विरोध पचवणे विकीला कसे जमले! ते चित्र मी येथे टाकले नाही. उगाच उपक्रम संपादक मंडळाला त्रास नको म्हणून! आणि हा प्रतिसाद लिहीताना गुगल इमेजवर सर्च केला तर बरीच चित्रे दिसली...
बाकी, धर्म कुठलाही असो, त्यात कट्टरपणा आला की त्याचा परिणाम विनाशातच होतो. हे १००% मान्य. फक्त माझ्या आधीच्या प्रतिसादाचा संदर्भ देऊन पुढे इतकेच म्हणीन की एकाचा कट्टरपणा चालवून घेतला तर नकळत आपण उर्वरीत समाजातील भावनीक वृत्तींना कट्टरपणा बाणवायचे खतपाणि घालत असतो. म्हणून all should be always equal असे म्हणावेसे वाटते.
सहमत
एकाचा कट्टरपणा चालवून घेतला तर नकळत आपण उर्वरीत समाजातील भावनीक वृत्तींना कट्टरपणा बाणवायचे खतपाणि घालत असतो.
सहमत आहे. इथे हिंदुत्ववादाचा विषय आहे म्हणून त्याबद्दल बोलणे झाले. पण मुस्लिम कट्टरपंथीय किंवा अगदी माझ्या घरी येऊन मला 'कन्वर्ट' करण्याचा प्रयत्न करणारे जेहोवा यांचा कट्टरपणाही तितकाच हानिकारक आहे. कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधात बोललो तर त्याचा अर्थ इतर धर्मियांना पाठींबा आहे असे अजिबात नाही. प्रश्न आहे की इतर धर्मियांच्या कट्टरवादाला आपण कसे उत्तर देतो. राजकारण्यांच्या चुकांमुळे बरेच घोळ झाले आहेत हे ही मान्य कारण त्यांना पहिला त्यांचा स्वार्थ (मतपेटी) दिसते. पण या बाबतीत म्हणजे जोधा-अकबर चित्रपट प्रदर्शित झाल्याने आपल्या समाजात इतका फरक पडला नसता असे वाटते. आणि त्यासाठी दंगली क